---Advertisement---

Nandurbar : ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चे पात्र लाभार्थी भाविक आज अयोध्या साठी रवाना

by team
---Advertisement---

नंदुरबार  : महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली होती. त्या योजने पहिला टप्पा आज अयोध्या साठी रेल्वेने रवाना झाला.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना  60 वर्षावरील भाविकांसाठी राबवण्यात आली होती त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत फ्रॉम भरण्यात आले होते. आज त्यातील जवळपास 800 भाविक हे अयोध्येसाठी रवाना झाले . अयोध्या येथे प्रभु श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या स्पेशल रेल्वेला शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी , आमदार आमश्या पाडवी, भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉ विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ हिना गावित , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी हिरवा झेंडा दाखवत या रेल्वेला रवाना केले. 

यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे ,समाज कल्याण निरीक्षक विवेक चव्हाण , जी आर पी एफ चे  सहहायक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ यासह रेल्वे विभागाचे अधिकारी समाज कल्याण विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. अयोध्येसाठी आज भावीक रवाना होत असताना भाविकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला भाविक नाचत गात जय श्रीरामाचा जयघोष करत अयोध्येसाठी रवाना झाले. यावेळी भाविकांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे ही योजना अत्यंत उपयुक्त असून आमच्यासारखा सामान्य नागरिकांना या योजनेतून देवदर्शन घेण्याचा लाभ मिळत आहे असे सांगितले.

यावेळी, भाजपचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले की,  महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली तीर्थ दर्शन योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी नंदुरबार मध्ये ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरण्यात आले जवळपास अडीच ते तीन हजार फ्रॉम भरण्यात आले .यामधून आज 800 लोकांची निवड करण्यात आली असून त्यांच्या पहिला टप्पा अयोध्येसाठी रवाना झाला आहे ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रसह  भारतातील तीर्थ दर्शन च्या लाभ घेता यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती भविष्यात ही योजना अशी सुरू राहण्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.  

यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली होती ती योजनेची पहिली रेल्वे आज अयोध्या साठी रवाना होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील नागरिक अत्यंत बिकट परिस्थितीत राहतात अशा नागरिकांना देवदर्शन घेता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना बंद करण्यात येईल अशा खोट्या गोष्टी सांगण्यात येत आहेत परंतु ही योजना भविष्यातही अशाच प्रकारे सुरू राहील असे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment