---Advertisement---
Nandurbar News : जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा रस्त्यावर तब्बल २५ लाख ५१ हजारांचा राज्यात प्रतिबंधित गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या हाती लागला. अमरावतीतील संशयिताला वाहनासह अटक करीत शहादा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा रस्त्याने राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा ट्रकमधून (एमएच ३१, सीक्यू ४३३५) चोरटी वाहतूक करणार आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा पोलीस ठाण्याच्या मदतीने प्रकाशा गावातील हनुमान मंदिराजवळ नाकाबंदी लावण्यात आली.
पथकाकडून तपासणी केली जात असताना, ट्रकमध्ये (एमएच ३१. सीक्यू ४३३५) येताना दिसला. ट्रकला पथकाने पथकाने थांबविले असता, चालकाने शागीर बेग सिकंदर बेग (वय ६२, रा. रेहमतनगर, गल्ली.नं. १. लालखडी रोड, अमरावती, ता. जि. अमरावती) असे नाव सांगितले.
वाहनात काय आहे याबाबत विचारता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. ट्रकच्या तपासणीत प्लास्टिकचे गोण्या दिसून आत्या. त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, तंबाखू आदी वाहनासह सुमारे २५ लाख ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. चालक शागीर बेग सिकंदर बेगविरुद्ध शहादा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी नीलेश देसले, उपनिरीक्षक भुनेश मराठे, पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस शिपाई शोएब शेख, भरत उगले आर्दीच्या पथकाने केली.