Nandurbar News : मोठ्या भावाच्या खूनप्रकरणी लहान भावाला सश्रम कारावास

---Advertisement---

 

नंदुरबार : मोठ्या भावाचा कुन्हाडीने खून केल्याप्रकरणी वाघदी (ता. नवापूर) येथील दाखल गुन्ह्याच्या खटल्यात नंदुरबार न्यायालयाने लहान भावाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वाघदी (ता. नवापूर) येथे सरीता नरेश गावीत यांचे घराचे बाजूला त्यांचा दिर विश्वास ऊर्फ विशु वसु गावीत हा वास्तव्यास होता. विश्वासने त्याचे घरासमोर राहणारी छगनीबाई गावीत हिचे सोबत भांडण करुन तिला मारहाण केली होती.

त्यावरुन छगनीबाईने विसरवाडी पोलीस ठाणेत विश्वास गावीत व फिर्यादीचा पती नरेश गावीत यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला होता. सदर खटला नवापूर न्यायालयात सुरु असतांना नरेश गावीत व विश्वास गावीत या दोन्ही सख्ख्या भावांना वेळोवेळी तारखेवर हजर राहावे लागत होते. त्यामुळे विश्वास याचा मोठा भाऊ नरेश गावीत यास पैसे व वेळ वाया जात असलेबाबत वाईट वाटत होते.

२५ ऑगस्ट २०२३ रोजी फिर्यादी सरिता गावीत व पती नरेश गावीत हे दाम्पत्य सायंकाळी जेवण करीत असतांना बाजुला राहणारा विश्वास गावीत तेथे आला. झालेले भांडण तसेच कोर्टकचेरी कामी खर्च होणारा खर्च यावरुन त्यांचेमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला. याचा विश्वासला राग आल्याने त्याने सरिता गावीत यांच्या घरातील कुन्हाड उचलून सरिता यांच्या डोक्यात टाकुन रक्तबंबाळ केले. त्याचवेळी तिचे पती नरेश गावीत हा विश्वास याच्यावर रागावला असता विश्वास याने नरेश याचे डोक्यात त्याच कुन्हाडीने वार केला. हा प्रकार पाहताच नरेश याची पत्नी सरीताने आरडाओरड केली. तेव्हा विश्वास हा घरातून पळून गेला होता. याप्रकरणी सरिता गावीत यांचे तक्रारीवरुन विसरवाडी पोलीस ठाणे येथे विश्वास याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी तपासात महत्वाचे पुरावे जमा केले होते. व संशयित आरोपी विश्वास ऊर्फ विशु खसु गावीत यास तात्काळ अटक करुन त्याचेविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते.

खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार किशोर पेठकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीत सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सबळ पुराव्याचे आधारे आरोपी विश्वास ऊर्फ विशु खसु गावीत, (रा. वाघदी, ता. नवापूर जि. नंदुरबार) याच्याविरुध्द आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने त्याला भा.दं.वि.क. ३०४ अन्वये दोषी ठरविले. तसेच त्याला १० वर्ष सश्रम कारावास व रुपये ५,०००/- दंड तसेच भा.दं. वि.क. ३२४ अन्वये वर्ष सश्रम कारावास व रुपये २५००/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

या खटत्यात सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता ॲड. महेश पाडवी यांनी कामकाज पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार पोहेकॉ/नितीन साबळे, पोकों/देवेंद्र पाडवी आणि टी.एम.सी. कक्षाचे पोहेकॉ शैलेंद्र जाधव यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---