नंदुरबार पोलिसांनी उतरवली टवाळखोरांची ‘रोमिओगिरी’

वैभव करवंदकर
नंदुरबार :
शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉपवर तरुणींची छेड, तसेच दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज काढणाऱ्या रोडरोमिओंना नंदुरबार पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. या कारवाईत तब्बल १७ रोडरोमिओंना सक्त ताकीद देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गर्दीच्या ठिकाणी तरुणींसह महिलांची छेड काढणाऱ्या, तसेच दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणाऱ्या रोडरोमियोंवर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, अश्या टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून, ही मोहीम प्रभावीपणे राबविणायत येणार असल्याची माहिती पी. आर. पाटील यांनी दिलीय.

17 युवकांवर कारवाई
नंदुरबार जिल्ह्यातील तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील नेहरु चौक, डी.आर. हायस्कूल परिसरात – 08, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील उड्डानपुल, सिंधी कॉलनी परिसरात – 05, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे – 02, विसरवाडी पोलीस ठाणे – 02 असे एकुण 17 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्येटवाळकी करुन तरुणीची छेडछाड करणाऱ्या युवकांना तसेच नागरिकांना त्रास देणाऱ्या टवाळखोर युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी तरुणींसह महिलांची छेड काढणाऱ्या, तसेच रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणारे, शिवीगाळ करणाऱ्याची माहिती तात्काळ डायल – 112 वर द्यावी असे आवाहन केले आहे.