धुळे : अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी होती. मात्र , वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या हा दर्जा दिला नाही. मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्याने काँग्रेला धक्का बसला आहे. मोदींनी हे काम कसे केले, असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार जोरदार काम करत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितले. ते विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या सभेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मी वाढवण बंदराचे नुकतेच उद्घाटन केले होते. त्याप्रसंगी या ठिकाणी विमानतळ व्हावे अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी मी याचे उत्तर दिले नाही. परंतु, आता महायुती सरकारच्या शपथविधी नंतर राज्यसरकारसोबत आम्ही बैठक घेऊ वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा केली जाईल.
महाविकास आघाडीच्या गाडीला ब्रेक व चाके नाहीत . यातच त्यांच्यात चालकांच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे होत आहेत. त्यांच्या सरकारने मागील अडीच वर्षात सरकारला लुटले. त्यानंतर विकास कामांना ब्रेक लागला. त्यांनी मेट्रोची व समृद्धी महामार्गाचे काम थांबवली. त्यांनी महाराष्ट्रातील विकासाची प्रत्येक योजना थांबवली. त्यानंतर, राज्यात महायुतीची सरकार सत्तेत आले. त्यानंतर अडीच वर्षांत चहुबाजूने विकास झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास भरभरुन झाला आहे. आता महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
महायुतीतर्फे वचननामा जाहीर करण्यात आला आहे. या वाचनाम्यातील दहा वचनांची सर्वत्र चर्चा होत आहे. जनतेने केलेल्या सूचनांनुसार हा वचननामा तयार करण्यात आला आहे. महायुतीचा वचननामा विकसित भारताचा आधार बनणार आहे. विकसित राज्य, विकसित राष्ट्रासाठी आमच्या बहिणींचे जीवन समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. महिलांनी प्रगती केली तर समाजाची देखील प्रगती होईल. यामुळे गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवत काम केले. महिलांच्या विकासाकरिता आम्ही सर्व पर्याय उघडले. त्यांना अधिकार दिले. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात महायुती सरकार विकासाचे काम काम करत आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.