---Advertisement---

Narendra Modi: ‘या’ देशाकडे सोपावली पुढील अध्यक्षपदाची जबाबदारी

by team

---Advertisement---

नवी दिल्ली : भारतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून  नवी दिल्ली येथे  G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आला होत. या परिषदेमध्ये वेगवेगळ्या देश्यांचे नेते सहभागी झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली,दिल्ली जाहीरनामाही प्रसिद्ध झाला. आर्थिक, व्यावसायिक, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आदी मुद्द्यांवरून विविध देशांनी विचारांचे  आदान-प्रदान केले.दोन दिवस चाललेल्या या बैठकीचे मोदी पंतप्रधान यांनी आज समारोप केला आहे. तसेच , नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी २० चं अध्यक्षपद भारताकडे आहे.त्यानंतर हे अध्यक्षपद दुसऱ्या देशाकडे देण्यात येणार आहे असे त्यानी सांगितले याबाबतही मोदी यांनी मोठी घोषणा केल्याचे समोर आले आहे.

 नरेंद्र मोदी म्हणाले की,

भारताकडे नोव्हेंबरपर्यंत जी २० चं अध्यक्षपद आहे. यासाठी अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसांत आपण सर्वांनी अनेक सूचना आणि प्रस्ताव मांडले आहेत. प्राप्त झालेल्या सुचनांवर आमच्याकडून विचार करण्यात येईल, ही आमची जबाबदारी आहे. नोव्हेंबरच्या शेवटी जी २० चं एक व्हर्चुअल सेशन ठेवलं जाईल. या सेशनमध्ये दोन दिवसीय शिबिरात झालेल्या मुद्द्यांची समिक्षा केली जाईल. तुम्ही या व्हर्च्युअल सत्रांत सहभागी व्हाल अशी आशा करतो. यासह, मी जी २० शिखर परिषदेचा समारोप घोषित करतो. ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लुला दा सिल्वा यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत जी २० च्या अध्यक्षपदाचं गेवल (प्रातिनिधिक चिन्ह) नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलं. म्हणजेच, नोव्हेंबर २०२३ नंतर जी २० चं अध्यक्षपद ब्राझिलकडे असणार आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---