पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ घोषणा

पंतप्रधान मोदी : G-20 परिषदेचे  अध्यक्षपद  भारताकडे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बायो फ्युएल अलायन्सची घोषणा केली आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे  फ्युअल अलायन्स सात G20 देश मिळून फ्युअल अलायन्सची स्थापना करण्यात आली आहे.  भारत, अमेरिका, इटली, ब्राझील आणि संयुक्त अरब अमिरातीसह चार आमंत्रित देशांनी मिळून ही बायो फ्युएल अलायन्स सुरू केली आहे.

बायो फ्युएल अलायन्सची उद्दिष्ट

जगभरात कार्बन-आधारित इंधनाचा वापर कमी करणे आणि इथेनॉलसारख्या जैवइंधनाचा वापर वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.भारताने २०२५-२६ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून इंधन पुरवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलं आहे, जे सध्या १० ते ११ टक्के आहे. २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन काही शहरांमध्ये उपलब्ध असलं तरी ते संपूर्ण देशात उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे.

भारताचा विकासयाच्या दृष्टीने ही युती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारताला या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान  आणि सर्वसमावेशक सहकार्य निर्माण करण्यात मदत होईल. जगातील ८० टक्के जैवइंधन अमेरिका, ब्राझील आणि भारतात तयार होते. जगातील ५० टक्के जैवइंधन अमेरिका तयार करते.ब्राझीलमध्ये ३० टक्के उत्पादन होते, तर भारताचा वाटा सध्या ३ टक्के आहे. उत्पादनाबरोबरच ८० टक्के वापरही या तीन देशांमध्ये होतो. भारत लवकरच जैवइंधनाचा मोठा उत्पादक आणि ग्राहक बनणार आहे.