Narendra Modi : यांनी केली चीन आणि पाकिस्तानची कान उघाडणी

नवी दिल्ली’:  ९ आणि १०  सप्टेंबर या दोन  दिवसात दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन व पाकिस्तानला फटकारले आहे. भारताने आपल्या देशात कोणत्या ठिकाणी मुत्सद्दी बैठका घ्यायच्या हे सांगण्याचा या दोघांना अधिकार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. भारताने काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी-20 बैठक आयोजित केल्याबद्दल चीन आणि पाकिस्तानने घेतलेले सर्व आक्षेप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की 

यजमान देशाने देशाच्या प्रत्येक भागात राजनैतिक बैठका घेणे स्वाभाविक आहे आणि ही त्यांची अंतर्गत बाब आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दशकापेक्षा कमी कालावधीत अर्थव्यवस्थेच्या पॅरामीटर्समध्ये पाच स्थानांनी झेप घेण्याच्या देशाच्या विक्रमाचा दाखला देत म्हटले की, ‘नजीकच्या काळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल.’ पीटीआयला सांगितले की ‘ फार पूर्वीपासून भारताकडे 1 अब्ज पोटे भुकेलेला देश म्हणून पाहिले जात होते. पण आता 1 अब्ज महत्वाकांक्षी मनांचा, 2 अब्ज कुशल हातांचा देश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की

भारताचा आर्थिक विकास हा त्यांच्या 9 वर्षांच्या सरकारच्या राजकीय स्थिरतेचा नैसर्गिक परिणाम आहे. ते म्हणाले की, भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल.ज्यामध्ये आपल्या राष्ट्रीय जीवनात भ्रष्टाचार, जातिवाद आणि जातीयवाद यांना स्थान नसेल. विशेष म्हणजे, कडेकोट बंदोबस्तात चीन आणि पाकिस्तानच्या तीव्र निषेधादरम्यान, मे महिन्यात भारताने काश्मीरमध्ये जी-20 पर्यटन बैठक आयोजित केली होती.