---Advertisement---

नरेंद्र मोदी ३ वर्षानंतर करणार UN च्या महासभेला संबोधित; सप्टेंबर महिन्यात अमेरिकी दौऱ्यावर जाण्याची शक्यता

by team

---Advertisement---

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक अधिवेशनाला पुन्हा संबोधित करू शकतात. यासंदर्भात संयुक्त राष्ट्राने तात्पुरती यादी जारी केली आहे. महासभेच्या ७९ व्या अधिवेशनात २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सोमवारी महासभेच्या चर्चेत भाग घेणाऱ्या वक्त्यांची यादी जाहीर केली.

कार्यक्रमानुसार, भारत सरकारचे प्रमुख दि. २६ सप्टेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ ते ६ या दरम्यान, म्हणजेच दि. २७ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० न्यूयॉर्कमधील महासभेला संबोधित करतील. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आमसभेच्या ७९ व्या सत्रात सर्वसाधारण चर्चा सुरू होण्यापूर्वी आपला अहवाल सादर करतील.

गेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदासाठी निवडून आलेले नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये महासभेच्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित केले होते. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी २१ जून रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व केले होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment