---Advertisement---
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात् नासाच्या ‘पर्सिव्हिअरन्स’ या रोव्हरने मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचे पुरावे शोधले आहे. रोव्हरने खोदलेल्या मातीत कार्बनसोबत सूक्ष्म जीव असलेले कण आढळल्याने तेथे मानवी जीवनाच्या शक्यतेला बळ मिळाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
२०२१ पासून मंगळावर भ्रमण करणाऱ्या रोव्हरने एका पाठविलेल्या मातीच्या छायाचित्राचे परीक्षण केले असता त्यात प्राचीन सूक्ष्मजीव आढळून आले. मातीची प्रयोगशाळांमध्ये सखोलपणे तपासणी केली जात आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी जारी केल्या निवेदनात म्हटले की,
मंगळावर भ्रमण करत असलेला रोव्हर थेट जीवसृष्टीशी संबंधित माहितीचा शोध घेत आहे.
मानवी वस्तीयोग्य मानल्या जाणाऱ्या ठिकाणांहून नमुने गोळा करण्यासाठी रोव्हरने अनेक ठिकाणी जमीन खोदली आणि त्यातून काढलेली मातीचे छायाचित्र पृथ्वीवर पाठविले. दोन शास्त्रज्ञांनी याला एक रोमांचक शोध म्हटले आहे; परंतु अजैविक प्रक्रियादेखील यासाठी कारणीभूत असू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पृथ्वीवरील प्रक्रियेशी समानता
जोपर्यंत हे नमुने मंगळावरून आणले जात नाहीत, तोपर्यंत शास्त्रज्ञांना प्राचीन मंगळावरील जीवसृष्टीच्या शक्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी पृथ्वीवरील तुलना आणि प्रयोगशाळेतील प्रयोगांवर अवलंबून राहावे लागेल. आज मंगळावर सूक्ष्मजीवांचे कोणतेही पुरावे नसले, तरी जेझेरो क्रेटरमधील तलावातील प्राचीन सूक्ष्मजीवांनी सल्फेट खनिजांचे रूपांतर सल्फाईडमध्ये केले असावे, ही प्रक्रिया पृथ्वीवर दिसून येते.
हा शोध का महत्त्वाचा?
स्टोन ब्रूक विद्यापीठाचे प्रमुख संशोधक जोएल हुरोविट्झ यांनी सांगितले की, सूक्ष्मजीव जीवसृष्टीसाठी संभाव्य घटक आहे. त्यांच्या निर्मितीसाठी कारणीभूत घटकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या शोधातून प्राचीन जीवसृष्टी सिद्ध झाली नसली, तरी आगामी काळात संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. हे नमुने ‘नेरेत्वा व्हॅलिस’ या नदीच्या पात्रातील लालसर, चिकणमाती-समृद्ध गाळाच्या खडकांमधून आले आहे. हे कण आयर्न फॉस्फेट आणि आयर्न सल्फाईडने समृद्ध होते.