Nashik Artillery Centre: नियमित प्रशिक्षण सत्रादरम्यान झालेल्या स्फोटात दोन अग्नवीरांनी गमावला जीव

Nashik Artillery Centre: भारतीय सशस्त्र दलात भरती करण्यासाठी अग्नीवीर योजना केंद्र सरकारने 2022 मध्ये सुरू केली. या योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्ष लष्करात नोकरी दिली जाते. या योजनेतील जवानांना  विविध राज्य सरकार पोलीस दल आणि केंद्र शासनाच्या सुरक्षा दलात भरतीसाठी आरक्षण दिले आहे.

अग्नीवर जवानांना प्रशिक्षण देणाऱ्या नाशिक आर्टिलरी सेंटर येथे एक दुःखद घटना घडली आहे. नियमित प्रशिक्षण सत्रादरम्यान झालेल्या स्फोटात दोन अग्नवीरांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये भारतीय लष्कारातील जवानांना प्रशिक्षण देण्यात येते. देशात अग्नीवीर योजना सुरु झाल्यापासून अग्नीवीर योजनेतील सैनिकांचे प्रशिक्षण नाशिकमधील देवळाली भागात होते.

गुरुवारी दुपारी १२ वाजता अग्नीवीर जवानांची तुकडी नाशिकमधील शिंगवे बहुलाला फायरिंग रेंजमध्ये सरावासाठी गेली होती. यावेळी तोफेजवळ गोळ्याचा स्फोट झाला. त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले पण जखमा इतक्या गंभीर होत्या की त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने तोफखाना केंद्रात शोककळा पसरली असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. या घटनेत दोघ जवानांचा मृत्यू झाला असून एक अग्निवीर जखमी झाला आहे.