---Advertisement---
पारोळा : नाशिकमधील दुचाकी चोरास पारोळा तालुक्यातील तरवाडे येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. हा चोरटा नाशिक येथून दुचाकी चोरी करुन जळगाव जिल्ह्यात कमी किमतीत विकायचा. त्याच्याकडून १९ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पारोळा तालुक्यातील आडगाव, तरवाडे, शिवरे व परिसरात कमी किमतीत दुचाकी विक्री होत असल्याची माहिती पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास मिळाली. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजु विठ्ठल जाधव, पोहेका प्रविण पाटील, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील यांना आरोपीच्या मागवा काढण्याचे सूचना दिल्या.
संशयित आरोपी किशोर संजय चौधरी पारोळा तालुक्यातील तरवडे आणि हल्ली मुक्काम सातपूर नाशिक हा नाशिक शहरासह इतर परीसरातुन दुचाकी चोरुन त्या विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो.स्टे. हद्दीत येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती.
या माहितीवरुन पथकाने पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात किशोर चौधरी यास पकडले. त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता संशयित आरोपी किशोर चौधरी याने नाशिक शहर हद्दीतून व परिसरातुन मोटार सायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली. त्याचेकडुन चोरी केलेल्या १९ मोटार सायकली हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत.
---Advertisement---