---Advertisement---
Jalgaon News: नशिराबाद पोलिसांनी यशस्वीरित्या एक शोध मोहीम फत्ते केली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा शोध घेत त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. हा तरुण गेल्या २ महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याचा पोलिसांनी कसून शोध घेतला. यात तरुणाच्या बँक खात्याच्या व्यवहारावरून तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा ठावठिकाणा लागता. त्यानुसार, पोलिसांनी तपसचक्रे फिरवित चक्क ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथून तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या तरुणाला पालकांच्या स्वाधीन करत मोहीम फत्ते केली आहे.
याबाबत माहिती अशी की, जय संजयकुमार जावरे (वय १८ वर्ष ३ महीने, रा. राजेश्वर नगर, रिंग रोड, भुसावळ) हा नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता होत दि. १८ जुलै रोजी तो बेपत्ता झाल्याची नोंद दाखल होती. जय संजयकुमार जावरे (वय १८) हा दि. १७ जुलै रोजी नशिराबाद येथुन कोणास काहीएक न सांगता निघुन गेला होता. त्याच वेळी त्याचा त्याचा मोबाईल नंबर देखील बंद होता. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारे लोकेशन मिळत नव्हते. परंतु पोलीस अधीक्षक रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शन घेवुन सहा. पोलीस निरीक्षक. ए. सी. मनोरे यांनी सदर प्रकरणात सहा. फौज. राजेश मेंढे, पो.हे.कॉ. कमलाकर बागुल व मिसींगचे चौकशी अंमलदार पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे, पोकों, प्रकाश कोळी यांचे तपासपथक नेमले होते. सदर तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी कुठलाही धागादोरा नसतांना, सदर बेपत्तामुलाचे बँक व्यवहार तपासले असता त्यावरुन व्यवहार झाल्याचे समजले.
त्यानुसार, तपास पथकाने सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. शिवनारायण देशमुख, पो.हे.कॉ. दिलीप चिंचोले, पो.ना. सचीन सोनवणे, पो.कॉ. दिपक सोनवणे यांचे मदतीने तांत्रीक माहीती घेवुन सदर व्यवहाराचे विश्लेषण केले. त्यावरुन बेपत्ता मुलगा हा ओरीसा राज्यात जगन्नाथ पुरी येथे असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलीस तपास पथकातील अंमलदार यांनी जगन्नाथ पुरी येथे जावुन दोन दिवस थांबुन अथक परीश्रम घेवुन तरुणाचा शोध घेतला. त्यास दि. २० सप्टेंबर रोजी सुमारे २ महीन्यानंतर सुखरुप परत आणुन त्याचे पालकांचे स्वाधीन करुन कौतुकास्पद काम केले आहे. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पथकातील अधीकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.









