---Advertisement---

अपघातातील मयताच्या कुटुंबियांना राष्ट्रीय लोक अदालतचा दिलासा, मिळाली भरपाई

by team
---Advertisement---

जळगाव :  जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत एक मोठा निकाल लागला, ज्यात अपघातातील जखमींना 43 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली. या प्रकरणाची घटना 26 एप्रिल 2020 रोजी घडली होती. जळगाव शहर महानगर पालिकेतील सफाई कर्मचारी रेहानाबी तस्लीम शेख (वय 42, रा. शिवाजी नगर, जळगाव) ह्या त्यांची स्कुटी (MH-19-BT-9974) चालवत असताना अजिंठा चौफुली कडून कालींकामाता मंदिराकडे जात होत्या. त्याच वेळी, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (MH-15-BG-7856) त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात रेहानाबी शेख आणि त्यांचा 4 वर्षीय नातू दोघेही घटनास्थळी मृत्यूमुखी पडले.

या घटनेनंतर मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी ट्रक चालक, ट्रक मालक, तसेच विमा कंपनी विरुद्ध नुकसान भरपाईसाठी जळगाव येथील मोटार अपघात दावा प्राधिकरणाकडे दावा दाखल केला. ट्रकचा विमा एच.डी.एफ.सी. जनरल इंश्युरन्स कंपनीकडे असल्यामुळे, सदर कंपनीच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला.

राष्ट्रीय लोक अदालतीत या प्रकरणाचा निपटारा करत, न्यायालयाने 43 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. मयत व्यक्तींच्या कुटुंबाचे वकील महेंद्र सोमा चौधरी यांनी अर्ज सादर केला, तर एच.डी.एफ.सी. विमा कंपनीच्या वतीने वकील जयंत फडके यांनी काम पाहिले.

———–

दरम्यान, झहीर खान विरुद्ध टाटा एआयजी या प्रकरणातील अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीने आभासी पद्धतीने(ऑनलाइन व्हाट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे) लोकन्यायालयात हजर होऊन सदर प्रकरण मिटून घेतले.  पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती एस. एन. मोरवाले तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ , पॅनल सदस्य ऍड. मंगला पाटील यांचे समक्ष सदर प्रकरण ऑनलाईन पद्धतीने मिटवण्यात आले. अपघातामध्ये जखमी झालेल्या जहीर खान यांना टाटा ए आय जी कंपनीतर्फे अडीच लाख रुपये मोबदला देऊन सदर प्रकरण तड जोडीने मिटवण्यात आले आहे. टाटा एआयजी कंपनीतर्फे ऍड. गोडबोले व जखमी जाहीर खान यांचे तर्फे ऍड. समदानी यांनी काम पाहिले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment