hailstorm rain : विदर्भासह संपूर्ण राज्यात गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतांमधील उभी पिके आडवी झाली आहेत. अवकाळी पावसाने महाराष्ट्रात गारवा प्रचंड वाढला. परिणामी अनेक रोगांनी डोके वर काढले आहे. hailstorm rain विदर्भात जवळपास ९५ टक्के गहू, हरभरा ही रबी पिके घरी आली असली, तरी उन्हाळी कांदा, पपई, आंबा, केळी, द्राक्ष, संत्रा बागांचे अतोनात नुकसान झाले आणि शेतक-यांवर संकटाने पुन्हा घाला घातला. hailstorm rain निसर्गाचं असं हे बेताल वागणं मानवासमोर संकटांची मालिका उभी करणार असली, तरी आलेल्या संकटाला दृढ इच्छाशक्तीने सामोरे जाणे एवढेच काय आपल्या हातात आहे. उन्हातान्हात राबणारा कष्टकरी, जगाचा पोशिंदा सुखाने जगावा असे कोणाला वाटणार नाही? परंतु, ही निकड शेतक-यांनीही काळाची गरज म्हणून लक्षात घेऊन स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे आहे. hailstorm rain मागील काही वर्षांपासून बदलते हवामान सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरला आहे. शेतामध्ये वारेमाप रासायनिक खतांचा वाढता वापर व कीटकनाशकाने जमिनीचा पोत अतिशय बिघडला आहे.
hailstorm rain त्यांच्या अतिवापराने भूगर्भातील पाण्याचे साठेही कोठे कोठे दूषित झाल्याचे निष्कर्ष हाती आले आहेत. मानव जातीसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. त्यामुळे किमान वाढत्या प्रदूषणावर आळा घालून निसर्गाचा बिघडलेला समतोल कसा राखला जाईल, हे बघणे उपयुक्त ठरेल. hailstorm rain संकट समयी राज्य शासन जनतेच्या पाठीशी सदैव उभे राहते. परंतु, त्यालाही मर्यादा येतातच. दिलेल्या मदतीने ना सरकार समाधानी असते ना शेतक-यांचे संपूर्ण नुकसान भरून निघते. शेवटी मदत ती मदतच! ती कधीच परिपूर्ण नसते. त्यामुळे हवामान बदलाशी आपल्याला कसे जुळवून घेता येईल, याचा शेतक-यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. hailstorm rain त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जैविक शेतीकडे अधिक लक्ष पुरविणे, शेतीला पूरक असा जोडधंदा व बदलत्या हवामानानुसार पीक पद्धतीमध्ये कसा बदल करता येईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पूर्वी गायी व बैलांची संख्या भरपूर असल्याने शेणखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. hailstorm rain विना पैशाचे हे शेणखत शेतीसाठी अमृतासम होते. परंतु, यंत्र युगात बैलांची जागा यंत्राने घेतल्यामुळे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही ग्राम संस्कृती शेतीला पूरक होती. hailstorm rain परंतु, बदलत्या काळानुसार सर्व काही बदलल्याने शेती डबघाईस आली.
hailstorm rain पूर्वी प्रथम क्रमांकावर असणारा शेती व्यवसाय आज कनिष्ठ झाला असून नोकरी उत्तम म्हणून गणल्या जात आहे. समाजात शेतीविषयी असलेली अनास्था व झटपट श्रीमंतीच्या नादात उभी राहणारी सुशिक्षित बेरोजगारांची फौज हा देशभरात सर्वांचाच चिंतेचा विषय ठरत आहे. गारपीट, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटाने शेतकरी संकटात सापडला; तरीही तो सक्षम असावा, एवढी श्रीमंती जेव्हा येईल तेव्हाच शेतकरी समृद्ध झाला, असे म्हणता येईल. hailstorm rain रासायनिक खते व कीटकनाशकामुळे एकीकडे जमिनीचा पोत खराब झाला. भरमसाट किमतींमुळे शेतीचे बजेटही पार बिघडले आहे. विदेशी कंपन्या मात्र गलेलठ्ठ होत गेल्या. रासायनिक खतामुळे उत्पादकता जरी वाढली असली, तरी त्या प्रमाणात खर्चही वाढला आहे. हा वाढता खर्च शेतक-यांच्या मुळावर उठला आहे. hailstorm rain दुसरीकडे दलालांचा वाढता विळखा शेतक-यांना सुखाने जगू देत नाही, हे वास्तव आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तीन कृषी कायद्यांची निर्मिती केली होती. परंतु, आज शेतक-यांचेच दुदैव म्हणावे लागेल की, केंद्र शासनाला ते कायदे मागे घ्यावे लागले. hailstorm rain शेवटी दैवाला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करणे हेच कधीही उत्तम…!
९८८१७१७८५६