---Advertisement---
डॉ. नितीनकुमार माळी नवापूर : देशभरात लोहमार्गाचे जाळे लहान-मोठ्या जंक्शन रेल्वेस्थानकांव्दारे विस्तारलेले असून, राज्यासह जिल्हा व तालुक्याच्या सीमारेषेच्या हद्दीत आहेत; परंतु पश्चिम रेल्वेमार्गावर एकमेव असे नवापूर रेल्वेस्थानक गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरच विभागले गेले आहे. नवापूर रेल्वेस्थानक प्रशासकीय इमारतीचे भाग तसेच प्रवासी बैठकीसह अन्य सुविधा दोन भागांमध्ये विस्तार असलेले स्थानक आहे.
नवापूर हा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शेवटचा तालुका. या ठिकाणी काही मैल अंतरावर महाराष्ट्र, गुजरात तसेच मध्य प्रदेश अशा तीन राज्यांची सीमारेषा आहेत; परंतु भुसावळ ते सुरतदरम्यानच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना सीमेवर वसलेले आणि जोडणारे नवापूर रेल्वेस्थानक भारतातील अद्वितीयच आहे.
दोन राज्यांचे कायदेसुद्धा वेगवेगळे
नवापूर रेल्वेस्थानक दोन राज्यांच्या सीमेवरच विस्तारित असले, तरी दोन राज्यांचे कायदे मात्र वेगवेगळे आहेत. गुजरातमध्ये दारू विक्रीला बंदी असून, गुजरात हद्दीत एसटी बस, रेल्वेगाडीने प्रवेश केल्यानंतर झाडाझडती होताना दारू विक्री वा
बाळगताना सापडला, तर गुन्हेगार ठरतो. मात्र, महाराष्ट्रात गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्रीवर बंदी आहे; परंतु बिअर वा दारू विकीला बंदी नाही. एका राज्यातून विक्री करून दुसऱ्या राज्यात प्रवेश केला, तर पोलिस प्रशासनही डोळेझाक करतात.
प्रवासी बैठक एकच; दोन भागांत
नवापूर रेल्वेस्थानकाचे फलाट विस्तीर्ण असले, तरी फलाटावरील असलेला प्रवासी बैठकीचा अर्धा भाग गुजरात व अर्धा भाग महाराष्ट्राला जोडला गेलेला आहे. त्यामुळे या बाकावर बसणाऱ्या प्रवाशांना दोन राज्यांत असल्याचा आभास होतो.
मत्स्य व्यवसायास चालना
मत्स्य व्यवसायास चालना नवापूरजवळच गुजरात राज्य हद्दीत तापी नदीवर उकाई प्रकल्प असून, यात मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय आहे. यातील मासळी उत्पादनाला थेट पश्चिम बंगालसह अन्य राज्यांत मोठ्या प्रमाणात मागणी असून, रेल्वे बोग्यांतून ती पाठविले जाते. व्यापारवृद्धी केंद्र व लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे महाराष्ट्र गुजरात या राज्यांच्या कापड तसेच हिरा आणि अन्य व्यापारवृद्धीला हातभार लागला आहे.
वाफेचे इंजिन ते लोकोमोटिव्ह दुहेरीकरण
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरत-भुसावळ एकेरी लोहमार्ग तसेच कोळसा व नंतर डिझेल इंजिन व त्यानंतर विद्युतीकरणानंतर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह असा होता. २०२४-१५ नंतर लोहमार्गाचे दुहेरीकरण होऊन मालवाहतूक व प्रवासी गाड्यांच्या संख्येत वाढ होऊन प्रगतिशील झाला आहे.
प्रवासी गाड्यांची उद्घोषणा चार भाषांमध्ये
देशभरात बहुतांश राज्यांमधील रेल्वेस्थानकांत प्राधान्याने हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक राज्यभाषा अशा तीन भाषांमध्ये उद्घोषणा होते. मात्र, पश्चिम रेल्वेमार्गावर असलेल्या आणि दोन राज्यांच्या टोकावरच असलेल्या नवापूर रेल्वेस्थानक हे मराठी, हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये प्रवासी गाड्यांसाठी उद्घोषणा केले जाणारे एकमेव आहे.
व्यापारवृद्धी केंद्र
लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे महाराष्ट्र गुजरात या राज्यांच्या कापड तसेच हिरा आणि अन्य व्यापारवृद्धीला हातभार लागला आहे. सुरतमध्ये कापड, हिरा उद्योग तसेच टेक्स्टाईल