Navratri Festival Rangoli Designs 2024 । नवरात्रीत ‘या’ सुंदर रांगोळ्यांनी सजवा अंगण

Navratri Festival Rangoli Designs 2024 । नवरात्रीचा महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू बांधवानी मोठ्या उत्साहात तयारी सुरु केली आहे. यंदा ३ ऑक्टोबरला नवरात्री साजरी केली जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला नवरात्री उत्सवात अंगण सजवण्यासाठी सुंदर रांगोळीच्या डिझाइन्स सांगणार आहोत. चला मग जाणून घेऊयात…

नवरात्रीत अंगणाचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि माँ दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अशा रांगोळी डिझाइन देखील करू शकता. यामध्ये रंगांचे त्रिशूल आणि कलश तयार करण्यात आले आहेत. शिवाय भोवती बांगड्या लावून रंग भरले आहेत.

या प्रकारची रांगोळी तुम्ही घरी किंवा मंदिरात बनवू शकता. यामध्ये गुलाबी, लाल आणि जांभळ्या रंगाचे वर्तुळ तयार करण्यात आले आहे तसेच पायांचे चिन्ह तयार करून त्याभोवती फुले व पानांची रचना करण्यात आली आहे.

नवरात्रीसाठी रांगोळीची ही रचना देखील अतिशय सुंदर आणि बनवायला सोपी आहे. यामध्ये रंगांनी पानाचा आकार करून त्याभोवती पायाच्या खुणा करून आत अंबाबाई लिहिण्यात आलं आहे. तसेच, भोवती बांगड्या लावून ते खास बनवण्यात आले आहे. याशिवाय एका ताटात अंबे मातेचे कोमल रूप तयार करण्यात आले आहे.

तुम्ही साधी रांगोळी डिझाइन शोधत असाल तर. तुम्ही या रांगोळी डिझाइनमधून कल्पना घेऊ शकता. यामध्ये पावलांचे ठसे तयार करून परिसराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. या प्रकारची रांगोळी तुम्ही अंगणात सहज बनवू शकता. अधिक आकर्षक करण्यासाठी आजूबाजूला दिवे लावण्यात आले आहेत.