---Advertisement---

राष्ट्रवादीतर्फे मोदी यांच्या आश्वासनांचा वाढदिवस केक कापून साजरा

by team

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षात दिलेले विकासकामांचे सर्व आश्वासन हे निष्फळ ठरत असल्याने मोदींच्या विकासकामांचा वाढदिवस म्हणजेच एप्रिल फूल दिवस म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहरातर्फे साजरा करण्यात आला.

 

नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने राष्ट्रवादीतर्फे त्यांच्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मोदी यांच्या आश्वासनांचा वाढदिवस विदुषकाच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक अध्यक्ष रिकु चौधरी, राजू मोरे , इब्राहिम तडवी, भगवान सोनावणे, किरण राजपूत, सहील पटेल, चंदन कोळी, चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, ललित नारखेडे, सचिन साळुंखे, योगेश साळी, रितेश महाजन, हितेश जावळे , भुमेश निंबाळकर , रहीम तडवी , आकाश हिरवाडे, योगेश कदम , भाला तडवी ,राहुल टोके , जूबेर खाटीक इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---