पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला खिंडार

---Advertisement---

 

पाचोरा : आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वडजी- गुढे गट व भडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट), माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत शिवसेना शहरासह ग्रामीण भागात बळ मिळवण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण व शहरातील माळी समाज व राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट) च्या पदाधिकार्यानी शिवसेनेत प्रवेश केला. यात महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस कीसान सेलचे अध्यक्ष दिपक संभाजी महाजन, संचालक रमेश महाजन, महात्मा फुले सेवाभावी मंडळाचे सचिव विनोद महाजन, माळी पंच मंडळाचे अध्यक्ष मुकुंदा महाजन, सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज महाजन, शिंदिचे माजी सरंपच दिपक महाजन यांच्यासह प्रकाश महाजन, विजय महाजन, नंदु महाजन, रामचंद्र परदेशी, संदिप परदेशी, राकेश महाजन यांचा समावेश आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक संजय पाटील, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, जिल्हा समन्वयक डाॅ.प्रमोद पाटील शहरप्रमुख आबा चौधरी, विजयकुमार भोसले, रावसाहेब पाटील, माजी नगरसेवक जगन भोई, उप तालुकाप्रमुख संजय वेलजी पाटील, गण प्रमुख सोनू महाजन, कोळगावेचे आबा महाजन, अनिल बिराडी आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---