---Advertisement---

नीट पीजी २०२५ परीक्षा आता होणार एकाच सत्रात, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

---Advertisement---

सर्वोच्च न्यायालयाने नीट- पीजी बाबत दाखल केलेल्या याचिकेवर निकाल दिला आहे. यानुसार, आता नीट यूजी प्रमाणे, नीट- पीजी परीक्षा देखील एकाच सत्रात घेतली जाईल. नीट पीजी परीक्षा १५ जूनपासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, न्यायालयाचा हा निर्णय खूप मोठा निर्णय मानला जात आहे.

तसेच, आपल्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना एकाच सत्रात परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्याचे आणि संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी नीट पीजी २०२५ परीक्षा दोन सत्रांऐवजी एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे निर्देश दिले.

न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. या खंडपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विक्रम नाथ होते. नीट पीजी २०२५ परीक्षा दोन सत्रात घेण्याबाबतच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने हा आदेश दिला.

१५ जून रोजी होणारी परीक्षा एकाच सत्रात घेण्याचे आदेश खंडपीठाने एनबीईला दिले. तसेच परीक्षा घेण्याची व्यवस्था आणि पूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करावी. आदेश देताना खंडपीठाने एक महत्त्वाची टिप्पणीही केली. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया म्हणाले की, दोन सत्रात परीक्षा घेतल्याने मनमानी होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment