Nepal Bus Accident : मंत्री रक्षा खडसे यांनी काठमांडू रुग्णालयात घेतली जखमींची भेट

काठमांडू  : नेपाळ येथे जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसचा शुक्रवारी , पघात झाला आहे. याअपघातात यात २७ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नेपाळला भेट दिली आहे. यात भेटीत त्यांनी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांच्यासह बस अपघातातील जखमींची त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयास भेट दिली.

दरम्यान, नेपाळ बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काठमांडू येथे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर, भेट दिली. यावेळी मंत्री खडसे यांनी भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत चर्चा केली. याप्रसंगी आमदार संजय सावकारे सुद्धा उपस्थित होते.

यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नेपाळ येथील बस अपघात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची त्रिभुवन युनिव्हर्सिटी टिचिंग हॉस्पिटल, काठमांडू येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी जखमींची संवाद साधला व उपचाराबाबत माहिती जाणून घेतली.

अशी घडली दुर्घटना
भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील ११० भाविक नेपाळ दर्शनासाठी १५ ऑगस्ट रोजी रवाना झाले होते. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. दरम्यान, बस क्र. यूपी.५३.एफटी.७६२३ ही भाविकांना घेवून पोखराकडून काठमांडा जाताना नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली. या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांच्यासह २७ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.