तरुण भारत । ४ जानेवारी २०२३। नेटफ्लिक्स हे एक असं माध्यम आहे ज्यावर आपण मूवी किंवा वेबसीरीस पाहू शकतो. जर तुमच्याकडे नेटफ्लिक्सच सब्स्क्रिबसशन नसेल तर तुम्ही तुमच्या मित्राकडे पासवर्ड मागून तुम्ही मूवी किंवा वेबसीरीस पाहू शकत होतात. पण तुम्हाला माहित आहे का? नेटफ्लिक्स च्या नवीन नियमानुसार आता तुम्हाला पासवर्ड शेयर साठी सुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत.
नेटफ्लिक्सचे आता नवीन फिचर आले आहे ज्यामध्ये तुम्हाला पासवर्ड शेयरसाठी पैसे मोजावे लागणार आहे. नेटफ्लिक्सच हे नवे पासवर्ड फिचर आहे. याआधी तुमच्याकडे जे नेटफ्लिक्सच सब्स्क्रिबसशन नसलं तरी सुद्धा मित्र किंवा नातेवाईककडून तुम्ही नेटफ्लिक्सचा पासवर्ड मागून तुम्ही मूवी किंवा वेबसीरीस पाहू शकत होता, पण आता असं करता येणार नाहीये. नेटफ्लिक्सच्या नवीन नियमानुसार तुम्हाला पासवर्ड शेयरिंग साठी पैसे मोजावे लागणार आहे.
कोस्टा रिका, चिली, पेरू या देशांमध्ये नेटफ्लिक्सची नवीन फिचरची चाचणी सुरु आहे. या देशात लोकांना नेटफ्लिक्स पासवर्ड शेयरिंग साठी $3, दर महिन्याला सुमारे 250 रुपये मोजावे लागतात. पण भारतामध्ये मित्रांच्या अकाउंट वर नेटफ्लिक्स चालविण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील? याबाबत माहिती मिळाली नाही.