नवा भारत केवळ बोलत नाही तर कृती देखील करतो : योगी आदित्यनाथ
रामपूर : नवा भारत केवळ बोलत नाही तर कृती देखील करतो , असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी रामपूरमध्ये केले. ते मंगळवारी रामपूरमध्ये खासदार आणि भाजपाचे उमेदवार घनश्याम लोधी यांच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शत्रू भयभीत झाला आहे. दहशतवाद संदर्भात निष्क्रियतेबाबतचे युग संपुष्टात आले आहे. करतारपूर साहेब कॉरिडॉरसाठी काँग्रेसला पाकिस्तानचा अडथळा वाटत होता. परंतु, मोदींनी हा कॉरिडॉर उघडला. मोदींनी अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर बांधले. मोदींनी सर्व काही केले आहे. मोदींची एवढी दहशत आहे की, कुठेही फटाके जरी फुटले तरी पाकिस्तानला आम्ही फटाके फोडले नाही असे स्पष्ट करावे लागते. शत्रूच्या मनामध्ये एकप्रकाची भीती दिसते आहे. हा नवीन भारत असून हा काही बोलत नाही तर घुसून मारतो असे सांगितले. मोदी सरकार हे जातीवर आधारित राजकारण करत नाही तर सर्वांच्या साथीने देशाचा विकास आर्थत सबका साथ सबका विकास या ब्रीदनुसार कार्य करत आहे. सरकारी योजना ह्या कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांपर्यंत पोहचवा. संसाधने प्रत्येक भारतीयांची असल्याने जात, धर्म, पंथ यांची पर्वा करू नका असे ते म्हणाले. मोदी सरकारचे आपल्या सर्वसमावेशक धोरणांद्वारे प्रत्येक चेहऱ्यावर हसू आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे योगी यांनी स्पष्ट केले.