भारताचा पराभव करत तब्बल ’36 वर्षांनंतर’ न्यूझीलंडने भारतात कसोटी सामना जिंकला

#image_title

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडने कसोटी सामन्यात भारताचा 8 गडी राखून पराभव करत 3-कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने न्यूझीलंडला 107 धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडसंघाने दोन गडी गमावून लक्ष्य गाठत भारताचा पराभव केला आहे.

न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने पहिल्या डावात 134 धावा केल्या होत्या. भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 46 धावा करून बाद झाला होता. त्याचवेळी न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंडने 356 धावांची आघाडी घेतली होती. दुस-या डावात भारताच्या सरफराज खानने 150 धावा करून संघात पुनरागमन केले, ऋषभ पंतने 99 धावा आणि कोहलीने 70 धावा केल्या, मात्र नंतरचा कोणताच फलंदाज महत्त्वाचे योगदान देऊ शकले नाहीत त्यामुळे भारतीय संघ 462 धाव करू शकला.


एकेवेळी दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या ४ गडी बाद ४०८ धावा होती पण त्यानंतर संपूर्ण संघ ४६२ धावांवर बाद झाला. तब्बल 36 वर्षांनंतर न्यूझीलंडने भारतात कसोटी सामना जिंकला आहे. याआधी 1988 मध्ये मुंबईत न्यूझीलंडने भारताविरुद्ध कसोटी सामना जिंकला होता. या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चमक पाहायला मिळाली. विल्यम ओ’रुर्कने कसोटीत 7 विकेट्स घेतल्या आणि मॅट हेन्रीने एकूण 8 विकेट घेतल्या. भारताच्या पहिल्या डावात हेन्रीने ५ बळी घेतले होते.

आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे. व मालिकेतील शेवटचा कसोटी सामना मुंबईत १ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.