IND vs NZ, 3rd Test: भारतीय संघाला व्हाईटवॉश! न्यूझीलंडने मालिका 3-0 ने जिंकली

#image_title

IND vs NZ, 3rd Test: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड संघाने टेस्ट मालिकेत भारताचा दारुण पराभव केला आहे. तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा २५ धावांनी पराभव करून न्यूझीलंडने मालिका ३-० ने जिंकली आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर व्हाईटवॉश मिळाला आहे.

न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग टीम इंडिया करू शकली नाही. वानखेडेवर एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या धोकादायक गोलंदाजीसमोर भारताचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. अवघ्या 121 धावांत संपूर्ण संघ बाद झाला आहे.

भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी

टीम इंडियाची फलंदाजी ही सर्वसाधारणपणे सर्वात मजबूत बाजू मानली जाते. पण मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात 147 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघासाठी हा सर्वात कमकुवत दुवा ठरला. ऋषभ पंतची ६४ धावांची खेळी वगळता एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. भारतीय संघातील 11 पैकी फक्त 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. म्हणजेच 8 फलंदाजांनी 10 पेक्षा कमी धावा केल्या. एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्सच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाही.

दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने 11 धावा केल्या आणि त्याचा सलामी जोडीदार यशस्वी जैस्वालने 5 धावा केल्या. याशिवाय पाठलाग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला विराट कोहली अवघ्या 1 धावा करून बाद झाला. शुबमन गिल आणि सर्फराज खानने 1-1 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 6 धावा, वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा केल्या, अश्विन 8 धावा करून बाद झाला. आकाश दीप आणि सिराज यांना खातेही उघडता आले नाही.