Stock Market : आज बाजार उघडल्यानंतर BSE सेन्सेक्सने 52 आठवड्यांचा उच्चांक 74,245.17 गाठला, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. त्यासोबतच निफ्टीने आपला 22,500 चा नवीन उच्चांक गाठला. यामुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बाजाराची सुरवात खास ठरली आहे.
निफ्टीच्या 50 समभागांपैकी 27 समभागांमध्ये वाढ तर 21 समभाग घसरत आहेत. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 17 समभाग वाढीसह व्यवहार करत आहेत तर 13 समभागांमध्ये घसरण होत आहे. सेन्सेक्समध्ये टाटा स्टील 3.63 टक्क्यांच्या वाढीसह आणि जेएसडब्ल्यू स्टील 3.21 टक्क्यांनी वाढले.
बीएसईचे मार्केट कॅप 392.46 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि आज त्यावर झालेल्या 2992 शेअर्सपैकी 1964 शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. 941 शेअर्समध्ये घट झाली असून 87 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 81 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 103 शेअर्सवर लोअर सर्किट लावण्यात आले आहे.