Jalgaon News : नऊ लाखांचे सोने घेवून सुवर्ण कारागीर पसार

जळगाव :  दागिणे घडण्यासाठी सुवर्ण कारागीराकडे सुमारे नऊ लाखांचे सोने देण्यात आत्यानंतर पश्मि बंगाल राज्यातील कारागीराने जळगावातून धूम ठोकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सराफा व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात संशयित कारागीर रतन तारपदा मांझी (चोकचायपाट, ता. दासपूर, जि. मिदीनापूर,पश्चिम बंगाल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सुभाशीष पंचानंद धारा (३३, पश्चिम ठाकू, राणी चौक, ठाणे खानाकुल, जि. हुगळी, ह.मु.बदाम गल्ली, जुने जळगाव)

यांनी शनीपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे रतन मांझी हा सुवर्ण कारागीर कामाला होता. त्याच्याकडे डाय पाडण्यासाठी १६२.९३७ ग्रॅम सोने १० नोव्हेंबर २०२३ रोजी देण्यात आले होते. मात्र संधी साधून संशयित पसार झाला. सर्वत्र शोध घेवूनही कारागीराचा शोध न लागल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.