निर्लज्जम् सदा सुखी!

 

तरुण भारत लाईव्ह।- नागेश दाचेवार। Corruption अलिकडेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात ‘लंगोटी पेपर’ असा उल्लेख केला होता. त्याच लंगोटी पेपरच्या एका उपकृत पदावर असलेला, विश्वप्रवक्ता म्हणतो, महाराष्ट्रातील राजकारणातून नैतिकतेचे अधःपतन झाले आहे. Corruption  पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देतो आणि महाराष्ट्रातील लुटोसिंग खुर्चीला चिकटून बसतो. खरं तर हे या व्यक्तीच्या तोंडून ऐकताच अवघ्या महाराष्ट्राला हसू आवरले नाही. कोण खुर्चीला चिकटून बसला? Corruption कुणी राजीनामा दिल्याचे जाहीर करून आजवर राजीनामा दिला नाही?, कोणी आपल्या नातेवाईकांना लाभ दिला?

कोणाच्या मालमत्ता अवैध असल्याने त्या जप्त आहेत?, कोरोनाकाळात महानगर पालिकेत कोणी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं?, हे सर्वांना माहिती आहे. Corruption आणि हो महाराष्ट्रातील राजकारणातून नैतिकतेच्या गप्पा कोण करतोय्?, ज्याने गरीब मराठी माणसांना बेघर केलं, ज्याने त्यांना बेघर करणा-याकडून खंडणी वसुल केली, ज्याने महिलांना अश्लील शिवीगाळ केली, ज्याने सार्वजनिकपणे कॅमेरांसमोर नेत्यांना अश्लील शिव्या देण्याची निर्लज्जता दाखविली… Corruption अशा या वृत्तींसाठी मराठीत एक म्हण आहे, निर्लज्जम् सदा सुखी!
काय गंमत आहे बघा, पंजाब सरकारमधले अन्न व नागरी पुरवठा मंत्री फौजासिंग सरारी आणि आरोग्य मंत्री विजय सिंगला  यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तत्काळ राजीनामे घेतल्याचा दाखला देत महाराष्ट्रातील राजकारणातून नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे कोण सांगत आहेत? Corruption तेच ज्यांनी निव्वळ भ्रष्टाचारच नव्हे, तर, देशद्रोह्यांसोबत आर्थिक संबंध ठेवून व्यवसाय करुन, देशविघात कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या गंभीर आरोपात तुरुगांत गेलेल्या मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा या शहाणपणा शिकविणा-या पगारी नोकराच्या मालकाने अखेरपर्यंत घेतला नाही. Corruption सरकार पडेपर्यंत मंत्रीपदी कायम ठेवण्याचा पराक्रम यांच्या मालकाच्या नावाने नोंदविला गेला आहे.
Corruption बरं मालक या पराक्रमाची नोंद करत असताना, याच महान व्यक्तीने एक ट्विट केले होते, Corruption ‘‘आमच्याशी समोरासमोर लढता येत नसल्याने, पाठीमागून अफझलखानी वार सुरु आहेत. चालु द्या. एक मंत्री कपट करुन आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊ द्या. Corruption नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये…” न्यायालयाने अजूनही जामीन दिला नाही. कपटाने टाकला तर, किमान जामीन तर मिळाला असता. नाही ना मिळाला जामीन… Corruption जेव्हा आरोप झाले तेव्हा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे मागितले आणि तुमचा मंत्री आत गेल्यावर हे नैतिकतेचे उदाहरण देणारा उपटसुभच काय सल्ला देताय् मालकाला? राजीनामा घेऊ नका म्हणून… मग तुरुगांत जाणा-या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा नाही आणि उलट तोंड उचलून लोकांना राजीनाम्याचे, नैतिकतेचे धडे द्यायचे? Corruption यालाच कदाचित निर्लज्जपणाचा कळस असे संबोधतात वाटतं.
Corruption Nawab Malik नवाब मलिकच काय? यांच्या मालकाने कोणाचे राजीनामे घेतले हे तरी सांगावे? संजय राठोड भाजपच्या प्रचंड दबावानंतर राजीनामा, पाठीशी घातले, साधी पोलिसात तक्रार देखील घेतली नाही. विना तक्रारीनेच क्लिन चीट, वाजे म्हणजे काय लादेन आहे का? म्हणत सचिन वाजे सारख्या खुन्याला आणि पोलिसात राहून गैरकायदेशीर कृत्य करणा-याला पाठीशी घातले… ते तर एनआयएच्या जाळ्यात अडकला तो… शंभर कोटी वसुली अनिल देशमुखांना दाखवला का मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता, होती हिम्मत? Corruption ते तर आधारवड साहेब दिल्लीपासून गल्लीपर्यंत पत्रकार परिषदाघेऊन देखील त्यांचा बचाव करु शकले नाही, तेव्हा साहेबांनी राजीनामा घेतला. तत्कालीन मंत्री अनिल परब झाले होते ना भ्रष्टाचाराचे आरोप, पाडला ना रिसॉर्ट, घेतला होता राजीनामा?
एवढेच नव्हे तर, कोविड सेंटर्स, ऑक्सिजन सेंटर्समध्ये भ्रष्टाचार झाला, त्यामुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले, स्वतःच्या पत्नीच्या नावाच्या ९ बंगल्याचा भ्रष्टाचार समोर आला, मेहूण्याची मालमत्ता जप्त झाली, नैतिक जबाबदारी स्वीकारुन कधी स्वतः मालकाने राजीनामा देण्याचा विचार केला नाही आणि हा वाचळवीर लोकांच्या राजीनाम्यावर तत्वज्ञान पाजळतोय्… Corruption लाजा तरी कशा वाटत नाहीत, याचेच नवले वाटते. अडीच वर्षाच्या कार्यकाळात, पातळीसोडून वापरण्यात येणा-या भाषेचा अविष्कार करणा-यांनी, आपल्या स्वार्थासाठी लोकांना पोलिसांकरवी अटक करणा-यांनी, लोकांची घरं तोडून सूड उगवणा-यांनी, सातत्याने त्वेषाचे राजकारण करणा-यांनी आता नैतिकतेचे धडे देणे म्हणजे, ख-या अर्थाने नैतिकतेचाच मुडदा पाडल्यासारखे म्हणावे लागेल. Corruption
हा काय फालतुपणा?
पगारी नोकर, युवराज आणि त्यांच्या पक्षाचे नव्हे गटाचे उरलेले नेते. Corruption हे सरकार अनैतिक, घटनाबाह्या असल्याचे सांगत फिरत असतात. रोज रोज एकच घासलेली कॅसेट वाजविताना दिसतात. सर्वोच्च न्यायालयात सहा-सात याचिका दाखल केल्या आहेत, ठाकरे गटाने. राज्यपालांनी सत्तास्थापनेला दिलेल्या निमंत्रणाला, बोलविलेल्या अधिवेशनाला, विधानसभाध्यक्षांच्या निवडीला अशा बèयाच गोष्टींना आव्हान दिलेत, यांनी न्यायालयात. ही सगळी प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. Corruption एका निवडणूक आयोगाच्या सुनावणी घेण्यावर बंदी करा, या तेवढ्या आचिकेवर निकाला आला. त्यातही ठाकरे गटाची मागणी, याचिका फेटाळली गेली. म्हणजे एकप्रकारे हारच म्हणावी लागेल. आता बाकी सर्व याचिका न्यायप्रविष्ट आहेत. असे असताना, निकाल लागण्या आधीच हे लोकं सरकारला अनैतिक आणि घटनाबाह्य ठरवून मोकळे झालेत? Corruption अर्थात हे स्वतः स्वतःला न्यायमूर्तीसमजून न्यायदानाची प्रक्रीया करुन मोकळे झालेत. असे म्हणायला हरकत नाही. शिवाय आता न्यायालयाच्या निर्णयाची गरज देखील ठाकरे गटाला नसावी बहुदा.
Corruption बरं मग या घटनाबाह्य सरकारच्या कामकाजात हे लोकं सहभागी का होतात? या घटनाबाह्य सरकारच्या कामकाजात आम्ही सहभागी होणार नाही, असे सांगून बहिष्कार का घातल नाहीत? मुळात या सरकारचं अस्तित्वच मान्य नाही या लोकांना, तर मग त्या अधिवेशनात बिलांवर सरकारकडून कसल्या अपेक्षा आणि का म्हणून व्यक्त करत होते हे लोकं? Corruption  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाविषयी विधानसभेत ठराव पारित करा असा आग्रह या घटनाबाह्य सरकारकडून का धरलात? त्यासाठी का आदळआपट केलीत? सरकारच घटनाबाह्य आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष घटनाबाह्य निवडले गेले आहेत, त्याला तुम्ही न्यायालयात आव्हान दिले आहेत. Corruption सरकारचे आणि विधानसभाध्यक्षाचे अस्तित्वच तुम्हाला मान्य नाही. मग त्या घटनाबाह्य सरकारने आणलेला ठराव देखील घटनाबाह्यच ना… शिवाय ज्या विधिमंडळाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ना त्या विधानसभेत पारित झालेला ठरावाला काय किंमत ?
मग अशा घटनाबाह्य ठरावासाठी तुम्ही लोकांनी आठवडा भर आपले रक्त आटवले, घशे कोरडे केले? Corruption कशासाठी? ख-या अर्थाने सरकार वैध, अवैध किंवा मग घटनाबाह्य हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय व्हायचं ते स्पष्ट होईल. पण त्यांचा निर्णय यायच्या आधी स्वतः निकाला देऊन मोकळे होणे, हा न्यायालयाचा अवमान असून, तो वारंवार ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. मुळात तुम्हीच म्हणताना याला तुरुगांत टाकू, त्याला तुरुंगात टाकू, असे भोंगे रोज सरकारचे मंत्री वाजवतात. यांनी न्यायालयावर स्वतःचे लोकं नेमले आहेत काय? Corruption असा सवालही करताना… मग त्याच न्यायाने हे सरकार आता न्यायालयाचा निर्णय आला की पडेल, घटनाबाह्य आहे… असे जे तुम्ही लोक बोलता, ते कोणाच्या जीवावर? तुम्ही तुमचे लोकं न्यायालयावर नेमले आहेत काय? याला निव्वळ बेताल बडबड आणि र्निबुध्दतेचे प्रदर्शन एवढेच म्हणता येईल.