---Advertisement---

‘त्याला’औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे; नितेश राणेंचा हल्लाबोल

by team
---Advertisement---

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, सोमवारपासून मुंबईत सुरू झालंय. मात्र, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना औरंगजेबचा पुळका आल्याचे पाहायला मिळाले. अर्थात अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असे वादग्रस्त वक्तव्य केले. आता या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे. आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

काय म्हणाले नितेश राणे? 

भाजपचे मंत्री नितेश राणे म्हणाले की, अबू आझमीसारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे. एवढं प्रेम औरंग्याबद्दल आहे तर त्यांना त्याच्या बाजूला झोपला पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर त्याच्यावर फक्त निलंबनाची कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

नेमकं काय म्हणाले अबू आझमी?

औरंगजेबाचा इतिहास चुकीचा दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची स्थापना केली, औरंगजेबाचा सैनिक हा बनारसमधल्या एका तरुणीशी बळजबरी करत होता, तिला लग्न करण्याची जबरदस्ती करत होता. तेव्हा औरंगजेबाने दोन हत्तींमध्ये बांधून त्या सैनिकाची हत्या केली. तेथील पंडितांनी औरंगजेबासाठी मस्जिद बांधून दिली, असे अबू आझमी यांनी सांगितले.

तसेच अबू आझमी यांना तुम्ही औरंगजेबाला क्रूर शासक मानता का?’ असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही, औरंगजेब हा उत्तम शासक होता. तेव्हाची लढाई राजकीय होती. तेव्हाची लढाई हिंदू-मुसलमान अशी लढाई नव्हती’ असं अबू आझमी यांनी म्हटलंय.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment