---Advertisement---

Raver: अहिरवाडी सरपंच सुनीता चौधरी यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर

by team
---Advertisement---

रावेर : तालुक्यातील अहिरवाडी येथील सरपंच सुनीता चौधरी यांच्याविरुद्ध आणलेला अविश्वास ठराव पारित झाला आहे. अहिरवाडी सरपंच सुनीता नागेश्वर चौधरी यांच्याविरुद्ध दहा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार यांच्याकडे दाखल केला.

या अनुषंगाने मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा झाली. या विशेष सभेत सरपंच सुनीता चौधरी यांच्या विरुद्ध दहा ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे सरपंच सुनीता चौधरी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याची सभेचे अध्यक्ष तहसीलदार बंडू कापसे यांनी जाहीर केले.

सरपंच व दोन सदस्य अविश्वास ठरावाच्या वेळी अनुपस्थित होते. या वेळी रणजित चौधरी, साबिया तडवी, शुभांगी चौधरी, राहुल महाजन, पांडुरंग महाजन, तेजस महाजन, संतोष महाजन, सरफराज तडवी, मीना तडवी, तुळसाबाई महाजन या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. हे सर्व सदस्य या सभेला उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment