Job-related: विना पदवीधारक करू शकतात ‘या’ नोकऱ्यांसाठी अर्ज, पहा यादी

Jobs Without Degree: जर तुम्हाला नोकरी करायची असेल, आणि तुमच्याकडे कुठल्याही शाखेची पदवी नसेल तर तुम्हाला नोकरी मिळणे फार अवघड होऊन जाते. पण तुम्हाला माहित आहे का ? कि, असे अनेक करिअर पर्याय आहेत ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पदवीची आवश्यकता नाही. या नोकऱ्या आकर्षक तर असतातच सोबत चांगला पगारही मिळतो. चला जाणून घेऊया अश्याच काही नोकऱ्यांबद्दल…

सोशल मीडिया एक्सपर्ट
सोशल मीडिया तज्ञ होण्यासाठी इंटरनेट आणि मार्केटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हे एक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे ज्यामध्ये चांगली कमाई शक्य आहे. ज्यासाठी तुम्हाला कुठल्याही पदवीची आवश्यकता नाही.

कमर्शियल पायलट
व्यावसायिक पायलट होण्यासाठी कोणत्याही विशेष पदवीची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण करून फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या व्यवसायात तुमचे मासिक उत्पन्न 4 ते 5लाख रुपयांपर्यंत असू शकते.

एअर होस्टेस
एअर होस्टेस होण्यासाठी तुम्हाला फक्त 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर, जर तुम्ही भौतिक मापदंडांची पूर्तता केली आणि चांगले संवाद कौशल्य असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. नवीन एअर होस्टेसला सुमारे 15,000 ते 20,000रुपये मासिक वेतन मिळते आणि अनुभवानुसार ते दुप्पट होते.

ग्राफिक डिझायनर
डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करून तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता. ग्राफिक डिझायनर्सची मागणी सतत वाढत आहे आणि त्यांना चांगले वेतन पॅकेज मिळत आहे.ग्राफिक डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पदवीची आवश्यकता नाही.