---Advertisement---
जळगाव : देशात कोणत्याही ठिकाणी जर फसवणूक किंवा अन्याय झाला अथवा कोणतीही अप्रिय घटना घडली तर अशा वेळी आपल्या रहिवासच्या गावी आल्यानंतर ऑनलाईन किंवा स्वतः जाऊन तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात देता येईल. तीन दिवसात याप्रकरणाबद्दल काय अॅक्शन घेतली. याची माहिती तपासाधिकारी यांच्याकडून तक्रारदार यांना प्राप्त होईल. त्यानंतर घटना घडलेल्या पोलीस ठाण्याकडे ही तक्रार सुपूर्द केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
फसवणूक, अपघात किंवा अन्याय याबद्दल अप्रिय घटना देशात कोठेही घडली असत्यास त्याच शहरात तक्रार देण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. गुन्ह्याच्या घटनेप्रकरणी तक्रार घेऊन नागरिक पोलीस ठाण्यात गेले तर हा विषय आमच्या कार्यक्षेत्रात नाही. त्यामुळे ती तक्रार येथे नोंदविता येणार नाही, तुम्ही अन्य पोलीस ठाण्यात जा, असे उत्तर नागरिकांना मिळणार नाही. भारतीय न्याय संहिता अधिनियमानुसार नागरिकांना कायद्यान्वये थेट ऑनलाईन तक्रार नोंदविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
त्यासाठी घटनेच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. तक्रारदार राहत असलेल्या गावातील, हद्दीतील पोलीस ठाण्यातही तक्रार ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष देऊ शकतील ऑनलाईन तक्रार घेतल्यानंतर तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात तीन दिवसाच्या आत बोलविण्यात येईल. तक्रारीची पडताळणी तपासाधिकारी करतील तक्रारीवर तक्रारदार यांची स्वाक्षरी घेतील. त्यानंतर घटना घडली त्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडे ही ऑनलाईन तक्रार सुपुर्द केली जाईल. त्या पोलीस ठाण्याचे अंमलदार या तक्रारीसंदर्भात तपासाला गती देतील. त्यामुळे नागरिकांनी त्यांना प्राप्त अधिकारांना ओळखून त्या अधिकाराने कार्य करावे.
सोशल मीडियावर बदनामी
सोशल मीडियावर शिवीगाळ अथवा बदनामी झाली असल्यास तर यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. असा प्रकार झाला असल्यास अशा वेळी तक्रारदार हे डिफेमेशन (बदनामी) ची तक्रार पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकतात. न्यायालयातही तक्रारीतून दाद मागता येईल तक्रारीनुसार याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करता येतो. तसेच तक्रारदार नुकसान भरपाई, बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर मागणी करु शकतो. तक्रारदार बदनामी करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवता येते. तक्रार देण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे म हत्वपूर्ण ठरु शकेल. डिफेमेशन तक्रारीला मुदत असते. त्यामुळे त्वरीत नोटीस पाठविण्याला तक्रारदार याने अक्रस्थान द्यायचे असते. बदनामी करणाऱ्या व्यक्ती विरुध्दचे सर्व पुरावे, जसे मेसेज, ई-मेल, सोशल मीडिया पोष्ट किंवा इतर कागदपत्रे गोळा करावे है तक्रार दाखल करण्यासाठी महत्वाचे ठरु शकतात. ही तांत्रिक आणि गुंतागुंतीची बाब असल्याने पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात ई-मेलव्दारे तक्रार करु शकता येते.
ई-साक्ष प्रणालीमुळे गुन्हेगारांवर वचक
नवीन कायद्यानुसार ई-साक्ष ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झाली आहे. यामुळे तक्रारदार यांचा वेळ वाचण्यास मदत झाली आहे. देशात कोणत्याही शहरात तक्रारदार याची फसवणूक, नुकसान किंवा अप्रिय काही घटना घडली असल्यास त्याबद्दल तक्रार स्वतः राहत असणाऱ्या शहरात पोलीस ठाण्यात ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष नोंदविता येते. संबंधित पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने स्थानिक पोलीस त्या सबंधित पोलीस ठाण्यात ही तक्रार वर्ग करतात. या प्रणालीमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत झाली आहे, अशी माहिती अॅड. कुणाल पवार यांनी दिली.









