मुंबई : राज्य सरकारने मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मराठीत न बोलणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात वा कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
सरकारच्या निर्देशानुसार, प्रत्येक सरकारी कार्यालयात मराठी भाषेचा सक्तीने वापर व्हावा यासाठी विशेष फलक लावले जाणार आहेत. तसेच, सरकारी कार्यालयांतील प्रस्ताव, पत्रव्यवहार आणि आदेश हे मराठीतच असतील, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : अनैतिक संबंधातून हत्याकांड, 35 वर्षीय सीमाला 29 वर्षीय प्रियकर राहुलने संपवलं
याशिवाय, केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये आणि विविध बँकांमध्येही मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी सर्व सूचनाफलक आणि नामफलक मराठीतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यभरात या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेला प्रशासनात अधिक महत्त्व मिळेल आणि नागरिकांना आपल्या मातृभाषेत सहज संवाद साधता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार?
रायगड : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात या विषयावर सखोल चर्चा झाली आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोगावले यांच्या नावाला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले जात आहे. भरत गोगावले हे चार वेळा आमदार राहिले असून अन्यायाविरुद्ध लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर सर्वांची सहमती असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल, असा दावा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.
हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!
महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. “प्रोटोकॉलनुसार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री पदाची मागणी करणे योग्य नाही. रायगडच्या जनतेने भरत गोगावले यांच्या रूपाने न्याय दिला आहे. मात्र, तटकरे मोठे मन दाखवत नाहीत. ते नेहमी स्वार्थी निर्णय घेतात. आता असे चालणार नाही. रायगडची जनता हा निर्णय स्वीकारणार नाही आणि फक्त भरत गोगावले यांनाच पालकमंत्री म्हणून मान्यता देईल,” असे दळवी म्हणाले.
हेही वाचा : धक्कादायक! महिलेने पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या अन्… नेमकं काय झालं?
रायगड जिल्ह्यावर फक्त शिवसेनेचा हक्क असल्याचा दावा महेंद्र दळवी यांनी केला. “मागील सरकारमध्ये आदिती तटकरे यांना पदत्याग करावा लागला तेव्हा आम्ही मोठा उठाव केला होता. सुनील तटकरे यांचा स्वभाव मिळेल ते मागण्याचा आहे. मात्र, आता त्यांची कोणतीही जादू चालणार नाही. पालकमंत्री पदावर तिसऱ्या कोणालाही संधी मिळू नये. आम्ही आमच्या पक्षातील कोणालाही पालकमंत्री पद स्वीकारण्यास तयार आहोत, परंतु आमचा हक्क भरत गोगावले यांच्या रूपानेच राहील,” असेही दळवी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चांवर आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. वरिष्ठ नेते या संदर्भात चर्चा करत आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत जाण्यामुळे थोडा उशीर झाला, पण लवकरच निर्णय होईल,” असे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात यासंदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.