---Advertisement---
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर होणारी आमरण उपोषणे, धरणे आंदोलने आणि निदर्शने आता बंद होणार आहेत. या आंदोलनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, रस्ता कोंडीमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यापुढे आंदोलनांसाठी जी.एस. ग्राउंड निश्चित केले आहे.
आंदोलनकर्त्यांना बजावली जात आहे नोटीस
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी परवानगी मागणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांना पोलिसांमार्फत नोटीस बजावली जात आहे. या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे आणि यापुढे त्यांनी आपले निदर्शन आंदोलन शांततेच्या मार्गाने जी.एस. ग्राउंड येथे करावे.
आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याचीही काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.