---Advertisement---
---Advertisement---
आता स्मार्टफोनच्या मदतीने क्षयरोगाचे निदान करणे शक्य आहे. आसाममधील तेजपूर विद्यापीठातील संशोधक पथकाने स्मार्टफोनच्या मदतीने क्षयरोगाचे निदान करणारे एक पोर्टेबल उपकरण विकसित केले आहे. भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक पवित्रा नाथ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ते विकसित केले आहे.
या नवीन उपकरणाला कोणत्याही रसायनांची किंवा रंगांची आवश्यकता नाही. क्षयरोगाच्या जीवाणूंमधून जी नैसर्गिक चमक (ऑटोफ्लोरेसेन्स) बाहेर पडते. त्याचा शोध घेण्यासाठी हे उपकरण वापरण्यात येते. या उपकरणात स्वयंचलित उष्णता प्रणाली आहे, असे नाथ म्हणाले. हे किफायतशीर देखील आहे. याची किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
उपकरणाचे वजन ३०० ग्रॅमपेक्षा कमी आहे. यामुळे ते पोर्टेबल आणि मर्यादित आरोग्यसेवा पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी योग्य आहे. क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी लवकर आणि अचूक निदान अत्यंत महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटना आणि भारताचा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात क्षयरोग तपासणीसाठी एलईडी फ्लोरोसेन्स मायक्रोस्कोपी हे सुवर्ण मानक असल्याचे सांगितले. एलइडी-एफएम पारंपरिक ऑप्टिकल मायक्रोस्कोपीपेक्षा जास्त संवेदनशील आहे, परंतु त्याचे अनेक तोटे आहेत.
ऑप्टिकल मायक्रोस्कोपी ही महागड्या उपकरणांवर, ऑरामाईनओ सारख्या रासायनिक द्रव्यरंगावर तसेच नमुना तयार करण्यासाठी आणि अर्थ लावण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. याशिवाय प्रयोगशाळेच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून राहिल्याने ते अनेक ग्रामीण भागात अव्यवहार्य ठरते, असे नाथ म्हणाले.
टीयू येथे विकसित केलेले हे उपकरण ऑटोफ्लोरेसेन्सच्या तत्त्वाचा वापर करते. ते मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (एमटीबी) पेशींसह काही सूक्ष्मजीव पेशींचा नैसर्गिक गुणधर्म आहे. ते प्रकाशाच्या विशिष्ट तरंगलांबीमुळे उत्तेजित झाल्यावर फ्लोरोसेन्स संकेत उत्सर्जित करतात.
सेन्सरमध्ये हीटिंग एलिमेंटचे एकत्रीकरण करणे ही मुख्य नवोपक्रमाची संकल्पना आहे. क्षयरोग जीवाणूच्या नमुन्याचे तापमान वाढवून, ही प्रणाली टीबी पेशींमधून नैसर्गिक फ्लोरोसेन्स संकेत वाढवते. यामुळे डाग किंवा रंगांचा वापर न करता ट्रेस-लेव्हल शोधणे शक्य होते, असे नाथ म्हणाले.