---Advertisement---

खुशखबर! आता जळगावकरांना मिळणार उष्णतेपासून दिलासा, मनपात ‘डस्ट सेपरेशन मशीन’ दाखल

---Advertisement---

जळगाव : उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या उष्णतेसोबत रस्त्यावरील धुळही जळगावकरांसाठी एक मोठे संकट ठरत आहे. परंतु आता जळगावकरांना त्याचा त्रास कमी होणार आहे, कारण महापालिकेकडून शहरातील मुख्य रस्त्यांवर धुळ कमी करण्यासाठी आणि वातावरणात गारवा निर्माण करण्यासाठी नवीन ‘डस्ट सेपरेशन मशीन’ दाखल झाले आहे.

शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे आणि मुख्य रस्त्यांवरही यामुळे नागरिकांना श्वसनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने पर्यावरण विभागाच्या ‘राष्ट्रीय शुध्द हवा’ उपक्रमांतर्गत ‘डस्ट सेपरेशन मशीन’ची अंम लबजावणी सुरू केली आहे.

रस्त्यावरील धुळी सोबतच, या मशीनच्या मदतीने हवेतील धुळदेखील कमी होईल. ‘डस्ट सेपरेशन मशीन’चा वापर कोल्हापूर, पिंप्री-चिंचवडसारख्या इतर महापालिकांमध्येही सुरू आहे, आणि याच योजनेतून जळगाव महापालिकेला हे मशीन प्राप्त झाले आहे.

‘डस्ट सेपरेशन मशीन ‘मुळे धूळ कमी होणार आहे. यासोबतच वातावरणातही गारवा निर्माण होईल. यामुळे जळगावकरांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळणार आहे. राज्यातील विविध महापालिकांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे आणि यामुळे तापमानात काही अंशी घट होईल, अशी अपेक्षा आहे.

असे असेल मशीनचे कार्य

या ‘डस्ट सेपरेशन मशीन’ मध्ये पाण्याचा टाकी, हवेचा डोम आणि पाईपद्वारे रस्त्यावर पाणी फवारण्याची व्यवस्था आहे. मशीन रस्त्यावर फिरल्यामुळे झाडांवर आणि रस्त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या धुळकणांचा निचरा होईल, ज्यामुळे धूळ कमी होईल. परिणामी वातावरणात गारवा निर्माण होईल. तसेच जळगावकरांना उन्हाळ्यात थोडा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे ही महत्त्वपूर्ण सुविधा जळगाव महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल आणि नागरिकांची जीवनशैली सुधारेल, अशी माहिती मनपा सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment