आता ट्विटर करेल इतर देश आणि संस्कृतींमधील ट्विटचे भाषांतर

तरुण भारत लाईव्ह  न्युज जळगाव : ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क हे ट्विटर संदर्भात नवनवीन बदल करीत असतात ट्विटरच्या साइटवर हे  अनेक बदल आपणास पाहायला मिळत आहेत. मग ते  इतर कोणतेही नवीन फीचर असो किंवा ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन असो . आता मस्क यांनी एक नवीन भाषांतर वैशिष्ट्य जाहीर केले आहे ज्यामुळे इतर देश आणि संस्कृतींमधून मजेदार ट्विट वाचणे सोपे होईल असे त्यांनी  ट्विटरवरच सांगितले की, येत्या काही महिन्यांत ट्विटर इतर देश आणि संस्कृतींमधील ट्विटचे भाषांतर करेल आणि त्यांच्या शिफारसी देखील पाठवेल.

. ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विटरवर आणखी अनेक नवीन फीचर्स new feature जोडण्याबाबत बोलले आहे. या नवीन फीचरचे स्पष्टीकरण देताना इलॉन मस्क म्हणाले की, ट्विटरवर दररोज वेगवेगळ्या देशांमध्ये खासकरून जपानी भाषेत उत्तम ट्विट पाहायला मिळतात. ट्विटर अशा ट्विट्सची शिफारस करण्यापूर्वी भाषांतर करेल शिफारस केलेले विरुद्ध फॉलो ट्विट्स दरम्यान हलविण्यासाठी डावीकडे / उजवीकडे स्वाइप करण्याचा पर्याय आणण्यासारखे. हा मोठ्या वापरकर्ता इंटरफेस दुरुस्तीचा भाग आहे.त्याचबरोबर बुकमार्क बटण हे देखील ट्विटरचे वैशिष्ट्य बनणार आहे. याशिवाय ट्विटरने ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी अँड्रॉइड आणि आयओएससाठी प्लॅनही जारी केले आहेत. याशिवाय कंपनीने लाँग फॉर्म ट्विट सुरू करण्याचीही योजना आखली आहे.