---Advertisement---

Numerology : ‘या’ तारखांना तुमचा जन्म झालाय का ? दोन लग्न करण्याचा आहे योग

---Advertisement---

Numerology : विश्वात मानवी स्वभावाचे विविध प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये मत्सर, आशावादी, विश्वासू, प्रेमळ, रागीट, संशयी तसेच निराशावादी व्यक्तिमत्त्वांचा समावेश आपणास दिसतो. यात काही लोक त्यांच्या नात्याशी प्रामाणिक नसतात, त्यांचे विवाहबाह्य संबंध असतात. तर काहींना आपल्या जोडीदाराचा स्वभाव पटत नसतो. यामुळे ते त्यांच्या नात्यात यशस्वी होत नाहीत. ते दुसऱ्या नात्याच्या शोधात असतात. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले असता, प्रत्येक संख्येचे स्वतःचे महत्त्व असते. ज्यावरून तुम्ही कोणत्याही संख्येच्या लोकांचा स्वभाव आणि भविष्याचा अंदाज वर्तवू शकतो. या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव इतरांची मन जिंकणारा असतो.

इतरांचे मन सहज जिंकणारी लोक

अंकशास्त्रानुसार ५ मूलांक हा कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेले लोकांचा असतो. बुध ग्रहाचा या लोकांवर प्रभाव असतो. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व व निर्भय स्वभाव हे इतरांचे मने जिंकतात. इतरांमध्ये लवकर मिसळणे हा त्यांच्या शैलीचा एक भाग असतो.

---Advertisement---

लवकर जुळवून घेतात

अंकशास्त्रानुसार, हे लोक कोणाशीही लवकर जुळवून घेतात आणि बहुतेकदा त्यांच्या फ्लर्टिंग स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांचा स्वभाव रोमँटिक असतो आणि बर्‍याचदा ते अतिरिक्त संबंधांकडे आकर्षित होऊ शकतात.

दोनदा विवाहाची शक्यता

अंकशास्त्रानुसार,५ मूलांकाचे हे लोक स्वतंत्र विचारसरणी जोपासणारे असतात. त्यांच्या पहिल्या लग्नायत अनंत समस्यांना सामोरे जावे लागत असते. यामुळे त्यांचे दुसरे लग्न होण्याची शक्यता अधिक असते.

लग्न बंधनात अडकायला आवडत नाही


अंकशास्त्रानुसार, ५ मूलांकाच्या लोकांना लवकर बंधनात अडकायला आवडत नाही. जरी त्यांचा विवाह झाला, तरी स्थिरता राखणे कठीण होऊ शकते. त्यांना स्वातंत्र्य आवडते, म्हणून ते नात्यात जागा मागतात.

कोणत्या लोकांशी चांगले जुळते?


अंकशास्त्रानुसार, १, ३ आणि ६ क्रमांकाचे लोक त्यांच्यासाठी चांगले जीवनसाथी ठरू शकतात. २ आणि ७ क्रमांकाच्या लोकांशी विचार जुळत नाहीत, ज्यामुळे नात्यात संघर्ष होऊ शकतो.

लोकांवर प्रभाव पाडण्यात प्रथम

अंकशास्त्रानुसार, ते चांगले व्यापारी बनतात कारण ते जोखीम घेण्यास आणि लोकांवर प्रभाव पाडण्यात पटाईत असतात. ते मार्केटिंग, मीडिया, सेल्स आणि पत्रकारितेत चांगले करिअर करतात.

मर्यादित पद्धतीने काम करायला आवडत नाही..
अंकशास्त्रानुसार, त्यांना फ्रीलान्सिंग आणि प्रवासाच्या नोकऱ्या आवडतात. त्यांना मर्यादित पद्धतीने काम करायला आवडत नाही

आरोग्य आणि कमकुवतपणा


अंकशास्त्रानुसार, या लोकांना लवकर मानसिक ताण येऊ शकतो. जास्त विचार केल्याने त्यांचा मेंदू लवकर थकू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्येत अनियमितता ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. बुधाच्या प्रभावामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---