जिल्हाधिकारी :पोषण आहार महाअभियानात जिल्हा कुपोषण मुक्तीत राज्यात अव्वल करा

जळगाव:  जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी सप्टेंबर महिना आपण पोषण आहार माह म्हणून साजरा करीत आहोत. या अभियानात जळगाव जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे.या अभियानाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून मुलांना आहार देण्यात आला आहे.विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

पोषण आहार महिन्याचे शेवटचे दोन दिवस असल्याने यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करून जिल्हा राज्यात या अभियानात अव्वल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.शेवटच्या दोन दिवसात अंगणवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी.जास्तीत जास्त संख्येने ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम दोन दिवसात राबवावेत. योग्य रितीने अंगणवाडी सेविका, मदतनीस डाटा एन्ट्री करून खात्री करावी.

काही समस्या व अडचणी असतील तर जि.प.चे महिला व बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.पूर्वनियोजित कार्यक्रम असेल त्यासाठी मी किंवा कुणी अधिकारी यांची उपस्थिती द्यावी, अशी आपली इच्छा असल्यास सीडीपीओशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी या अभियानाला गती देण्याची सूचना त्यांनी केली.