तरुण भारत लाईव्ह न्यूज । केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभाग व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने तानाजी मालुसरे नगर ( कांचन नगर) येथे पौष्टिक नाश्ता स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभाग व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पौष्टिक नाश्ता स्पर्धेत कांचन नगर, तानाजी मालुसरे नगर येथील ४१ महिलांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून विविध प्रकारचे रुचकर पदार्थ नाश्ता म्हणून बनवून त्याचे महत्व यावेळी मांडण्यात आले. परिक्षकांनी प्रथम क्रमांक शारदा सपकाळे यांनी बनविलेल्या पदार्थास, द्वितीय क्रमांक शारदा धर्मे तर तृतीय क्रमांक गायत्री सपकाळे पौष्टिक पदार्थ म्हणून सरोज मराठे, उत्कृष्ठ सजावट गायत्री सुर्यवंशी, जयश्री सोनवणे, उज्वला सपकाळे यांना दिला. पारितोषिक वितरण रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या डॉ. वैशाली जैन, डॉ. विद्या चौधरी, केशवस्मृती सेवावस्ती विभाग सहप्रमुख मनिषा खडके, ज्योत्सना रायसोनी, अनिता वाणी, स्थानिक नगरसेविका रंजना सपकाळे, शोभा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आहारतज्ज्ञ डॉ. विद्या चौधरी यांनी उपस्थित महिलांना आहाराचे महत्व विशद करून दैनदिन जिवनात रोज कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे व आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे याचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा तायडे यांनी केले. यशस्वितेसाठी सुनिता सपकाळे, भाग्यश्री कोळी, राधिका गरुड, निता सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.