दिल्ली मनपा निवडणुकीच्या जनादेशाचा अन्वयार्थ !

– श्यामकांत जहागीरदार निवडणूक, जनादेश 

Delhi mcd result दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आम आदमी पक्ष (आप) विजयी झाला. चौथ्यांदा महानगरपालिका जिंकण्याचे भाजपाचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नसले, तरी भाजपाचा पूर्ण पराभवही झाला नाही. Delhi mcd result २५० सदस्यीय दिल्ली महापालिकेत आपला १३४ तर भाजपाला १०४ जागा मिळाल्या. काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही; ९ जागांवर समाधान मानावे लागले. Delhi mcd result एक्झिट पोलमध्ये दिल्ली मनपात आपचीच सत्ता येणार, हे दर्शविण्यात आले होते. ते खरे ठरले असले, तरी त्यातील अंदाजापेक्षा आपला ब-याच कमी जागा मिळाल्या तर भाजपाच्या काही जागा वाढल्या. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर आप आणि भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. Delhi mcd result आपला ४३ टक्के मते मिळाली तर भाजपाला ४० टक्के. Delhi mcd result याचाच अर्थ दिल्लीच्या जनतेने भाजपाला पूर्णपणे नाकारले नसले, तरी काही प्रमाणात आपली नाराजी व्यक्त केली, असे म्हणायला हरकत नाही.

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीला यावेळी अनन्यसाधारण महत्त्व आले होते. Delhi mcd result दिल्ली महानगरपालिका लोकसंख्या, सदस्यसंख्या आणि अर्थसंकल्पाच्या दृष्टीनेही देशातील अनेक राज्यांच्या विधानसभांपेक्षा कितीतरी मोठी आहे. आतापर्यंत दिल्लीत तीन महानगरपालिका होत्या. पूर्व, उत्तर आणि दक्षिण दिल्ली अशा तीन महानगरपालिकांचे एकत्रीकरण करीत मोदी सरकारने एकच महानगर पालिका तयार केली. Delhi mcd result जुन्या तीन महानगरपालिकांत २७२ सदस्य होते, नवीन एकीकृत महानगर पालिकेत सदस्यांची संख्या २२ ने कमी करून ती २५० वर आणण्यात आली. भाजपाने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत एखाद्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीलाही लाजवेल असा प्रचार केला होता. Delhi mcd result दीड डझन केंद्रीय मंत्री, सहा राज्यांचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय स्तरावरचे भाजपाचे अनेक नेते तसेच शंभरांवर खासदारांना प्रचारासाठी उतरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत. Delhi mcd result मात्र, दिल्लीची निवडणूक भाजपाने मोदी यांच्या नावावर आणि कामावर लढवली. Delhi mcd result आपप्रमाणे भाजपा आणि काँग्रेस यांनीही या निवडणुकीत दिल्लीच्या मतदारांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. तरीसुद्धा दिल्लीचा मतदार आपकडे का झुकला, याचा आता भाजपाला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.

Delhi mcd result दिल्लीच्या जनतेने लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातपैकी सात जागा भाजपाच्या झोळीत टाकल्या. मग त्यानंतर झालेल्या सलग दोन विधानसभा निवडणुकीत असे काय झाले की, दिल्लीच्या जनतेने आपला जनादेश आपला दिला. आतापर्यंत भाजपाच्या ताब्यातील महानगरपालिकाही आता आपने जिंकली आहे. Delhi mcd result लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करणारी दिल्लीची जनता आधी विधानसभा आणि नंतर महानगरपालिका निवडणुकीत आपला मतदान का करते, हा मोठा संशोधनाचा विषय म्हटला पाहिजे. Delhi mcd result दिल्लीतील मोफत वीज आणि मोफत पाणी योजनांना यासाठी जबाबदार धरणे घाईगर्दीचे ठरणार आहे. हे एक कारण असले, तरी एकच कारण नाही. त्यामुळे असे करणे आत्मवंचना ठरणार आहे. दिल्लीच्या मतदारांचाही हा अपमान ठरेल, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. Delhi mcd result त्यामुळे आपले कुठे चुकले याचे आत्मपरीक्षण करणे भाजपाच्या दीर्घकालीन हिताचे ठरणार आहे.

देशातील अन्य राज्यांत विधानसभा निवडणुका लढवताना भाजपा डबल इंजिन सरकारच्या गोष्टी करते. म्हणजे केंद्रात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे राज्यात तुम्ही भाजपाचे सरकार आणले तर राज्याच्या विकासाला मोठी गती मिळेल, असा प्रचार भाजपा करीत असते. Delhi mcd result भाजपाच्या या डबल इंजिन प्रचारावर दिल्लीची जनता भाळली, असे म्हणायला हरकत नाही. दिल्लीत आपचे सरकार असताना दिल्लीच्या जनतेने दिल्लीची महानगरपालिकाही आपला दिली आहे. आपने निवडणुकीत ‘दिल्लीत केजरीवाल की सरकार, केजरीवाल का पार्षद’ अशी घोषणा दिली होती. Delhi mcd result ही घोषणा दिल्लीच्या जनतेने सार्थ ठरवली. यामुळे आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. दिल्ली महानगरपालिकेत गेल्या १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता होती. त्यामुळे काही प्रमाणात भाजपाबद्दल अ‍ॅण्टिइन्कमबन्सीचीही भावना होती, हे नाकारता येणार नाही. दिल्लीत आपचे सरकार असल्यामुळे केजरीवाल भाजपाच्या ताब्यातील महानगरपालिकांना पुरेसा निधी देत नाही, असा प्रचार भाजपा करीत होती. Delhi mcd result त्यात तथ्य नव्हते असे नाही; पण १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असतानाही दिल्लीच्या जनतेला ज्या प्रमाणात नागरी सुविधा मिळायला हव्या होत्या, त्या मिळू शकल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.