कृष्णराज पाटील
जळगाव : वर्षभरात 11 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध विभागात आतापर्यंत 25 लाचखोरीचे गुन्हे उघडकीस आले. यात बहुतांश शासकीय कर्मचारी वर्ग तीनचे आहेत. यात सर्वात जास्त महसूल, पोलीस विभाग आणि अन्य विभागात लाचखोरीचे गुन्हे उघडकीस आले. गेल्या पाच-सहा वर्षांत सर्वसामान्यांच्या जागरूकपणामुळे 162 लाचखोरांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई करण्यात आली असल्याची माहीती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकार्यांनी दिली.
राज्यभरात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती व नांदेड असे आठ विभाग आहेत. त्यातील सर्वात जास्त पुणे विभाग लाचखोरीत पुढे आहे. महसूल, पोलीस, शिक्षण, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा अनेक विभागात सर्वसामान्य नागरिकांचा थेट संपर्क येतो, अशा ठिकाणी शिपायापासून ते वरच्या स्तरावर लाच देण्याचे तसेच मागण्याचे प्रकार वाढले आहेत.
जळगाव विभागाची कामगिरी सरस
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे यांच्या मार्गदर्शनानुसार उत्तर महाराष्ट्रात नाशिक 39, नगर 24, जळगाव 25 धुळे 25, नंदुरबार 8 अशी एकूण 121 लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील आणि त्यांच्या पथकाने विविध विभागातील 25 लाचखोरांना सापळा लावून अलगद अडकवण्याची सरस कामगिरी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी शर्मिला घारगे यांनी नुकताच गेल्या सप्ताहात पदभार सांभाळला आहे.
गत पाच-सहा वर्षांचा कारवाई आढावा 2022 मधील विभागनिहाय कारवाई
वर्ष – लाचखोर – जि.प.- पंचायत समिती 2, ग्रामपंचायत-2….-4
2017- 26 महसूल विभाग………………………………..-5
2018- 30 पोलीस प्रशासन……………………………….-4
2019- 31 वन विभाग, कृषी, उर्जा कामगार विभाग,
2020- 20 शिक्षण, सहकार, महवितरण, वैधमापन
2021- 33 (वजनमाप) विभाग प्रत्येकी एक …………….-7
2022- 22 (जानेवारी ते 29 नोव्हेंबर) खाजगी इसम/व्यक्ती…………………………-2
———————————————————————–
एकूण -165 28 नोव्हेंबर 2022 अखेर ………………….25
कामाच्या पूर्ततेसाठी अडवणुकीसह होते पैशांची मागणी
एकीकडे ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ घोषणेसह जनजागृती करीत कर्मचार्यांना शपथ दिली जाते. परंतु दुसरीकडे हेच शासकीय अधिकारी, कर्मचारी नव्हेतर खासगी इसमदेखील रीतसर काम होत असतानाही कागदपत्रांमध्ये हेतूपुरस्सर त्रुटी काढून चार दिवसांनी या, वरच्या साहेबांकडे फाईल गेली आहे, किंवा ‘चर्चा करा’ असे सूचवित अडवणूक करून लाच घेण्याचे प्रकार वाढले आहेत. हे समाजासह भावी पिढीसाठी चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास, अँन्टी करप्शन ब्युरो, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे तत्काळ संपर्क साधावा किंवा दुरध्वनी क्र. 0257-2235477, मोबाइल क्रं. 8766412529, टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.
-शशिकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव.