नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक खुप मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही ७ ते १० सप्टेंबर दरम्यान रेल्वेने प्रवास करत असाल तर हि बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे. भारतीय रेल्वे विभागाने ३०० हून अधिक रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे प्रवाशांचे खुप मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.
राजधानी दिल्ली मध्ये ९ आणि १० सप्टेंबर मध्ये होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेमुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.भारतीय रेल्वे विभागाने विविध गाड्यांची यादी जाहीर केली आहे.३०० पेक्ष्या जास्त रेल्वे गाड्यानवरती त्याचा परिणाम होणार आहे. आणि २०० पेक्ष्या जास्त रेल्वे गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.