---Advertisement---

निवडणुकीच्या वादातून बंदूक लावून जीवे ठार मारण्याची धमकी

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज  जामनेर:तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे मंगळवारी गावातीलच एकाने माजी सरपंचाच्या छातीवर बंदूक लावत तुला संपवुन टाकतो, मग पहा तुझ्या पॅनलचे काय होते, अशी धमकी दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडित गोसावी, तुषार संजय गोसावी (दोघे रा. हिंगणे ता. जामनेर) यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रुक येथील माजी सरपंच अनिल चौधरी हे गावात असताना ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी याने त्यांच्या छातीला बंदूक लावून धमकी दिली. तर त्याच्यासोबत असलेला तुषार संजय गोसावी याने कॉलर पकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नागरिक जमा झाल्याने दोघांनी पळ काढला. अनिल चौधरी यांचा नर्सरी आणि शेतीचा व्यवसाय आहे. १३ डिसेंबरच्या सायंकाळी ज्ञानेश्वर आणि तुषार या दोघांनी अनिल चौधरी यांना ५ हजार रुपयांची मागणी केली. यावर अनिल चौधरी यांनी आपल्याजवळ आज पैसे नसून काम असल्यास उद्या देतो असे म्हटले.

अनिल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर गोसावी व तुषार गोसावी यांच्याविरुध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहीते करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment