---Advertisement---

जळगावात मनपाच्या घंटागाडी आणि कचरा डेपोत आढळले आक्षेपार्ह मांस, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

---Advertisement---

जळगाव : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या मनपाच्या घंटागाडी आणि निमखेडी शिवारातील कचरा डेपोत आक्षेपार्ह मांस आढळून आले आहे. नुकतीच बकरी ईद साजरी झाली आहे. त्यातच हे आक्षेपार्ह मांस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

शहरातील कचरा संकलन करण्यासाठी मनपातर्फे घरोघरी घंटागाडी उपक्रम राबवून घंटागाडी पाठवत कचरा संकलन केले जाते. घंटागाडीद्वारे जमा झालेला कचरा निमखेडी शिवारातील कचरा डेपोत डंप केला जातो. अशात कचरा वाहून नेणाऱ्या महापालिकेच्या वाहनामध्ये आक्षेपार्ह मांस आढळून आले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

वाहनातून आक्षेपार्ह मांसची वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत संबंधित वाहन अडवून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आणून कारवाईची मागणी केली.

पोलिसांनी महापालिकेच्या आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून मांसाचे नमुने तपासणीसाठी घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम राहिल्याने काही काळ पोलिस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, कचरा डेपोत मांसाचे तुकडे विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप देखील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment