Jalgaon News: जुन्या रद्द झालेल्या जि.प.भरतीची 1 कोटींची रक्कम उमेदवारांना मिळणार परत

जळगाव : जिल्हा परिषदेची मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 मध्ये भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या भरतीसाठी परिक्षा झालीच नाही. त्यामुळे शासनाने उमेदवारांकडून घेतलेले परिक्षा शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने या जुन्या भरतीतील 56 हजार अर्जांची रक्कम्र सुमारे एक कोटी रुपये उमेदवारांना परत करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी दिली.या उमेदवारांना त्यांची अर्ज भरल्याची रक्कम परत करण्यासाठी एक लिंक तयार करण्यात आली आहे.

https://youtu.be/b3tRI041zq8

त्यात संबंधित उमेदवारांना आपला मोबाईल व इमेल आयडी व बँक खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामाध्यमातून ऑनलाईन ही रक्कम अर्जदार उमेदवारास ऑनलाईन दिली जाणार आहे. त्यामुळे जुन्या रद्द झालेल्या भरतीचे पैसे संबंधित उमेदवारांना अदा करण्यासाठी जळगावय जि.प.ला एक कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. परिणामी या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.