तरुण भारत लाईव्ह । विजय निचकवडे।
Culture of Vidarbha विदर्भ प्रतिभेची खाण आहे. या प्रतिभेला योग्य दिशा मिळाल्यास देशभर आपला डंका मिरविला जाऊ शकतो, हे सर्वश्रुत आहे. याच प्रतिभेचे दर्शन पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होऊन तब्बल ३० वैदर्भीय कलाकारांच्या कलेची झलक अख्खा देश पाहणार आहे. Culture of Vidarbha आजपर्यंत राजपथ असलेल्या कर्तव्यपथावर आता हे वैदर्भीय भुरळ घालणार, हे नक्की! मिळालेल्या संधीचे सोने केले की, नव्याने अनेक संधी चालून येतात. आपली कला लोकांच्या पसंतीस उतरविण्याचे कसब ज्या कलावंतांमध्ये असेल, ते यशस्वी होतातच, हेही तेवढेच खरे! Culture of Vidarbha महाराष्ट्रात पर्यायाने विदर्भात प्रतिभेची कमी नाही. अनेक प्रतिभावंत विविध क्षेत्रांत विदर्भाने दिले आणि आज ते आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून आहेत. Culture of Vidarbha मग ते क्षेत्र कोणतेही असो!
कलेचे क्षेत्रही यात मागे नाही. Culture of Vidarbha ग्रामीण भागातील लोककला आजही लोकांच्या मनात घर करून आहे. सुप्तगुण असलेले कलाकार अनेक असतील. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी संधी मिळेलच असे नाही. अनेकदा या प्रतिभावंतांची प्रतिभा ग्रामीण भागातच खितपत पडली राहते. मात्र, सध्या विदर्भातील जवळपास ३० कलावंत आपल्या कलेने संपूर्ण देशवासीयांचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने परिश्रम घेत आहेत. Culture of Vidarbha प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथील आतापर्यंतच्या राजपथावर होणारे संचलन आणि त्यात विविध राज्ये आणि मंत्रालयांचे सहभागी होणारे चित्ररथ वेगळे महत्त्व ठेवून आहेत. प्रत्येक राज्यासाठी राजपथावरून जाणारे हे चित्ररथ अभिमानाने ऊर भरून आणणारे असतात. महाराष्ट्रही आजपर्यंत यात कुठेही मागे पडला नाही. Culture of Vidarbha मात्र यावेळी याच कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा आणि खास करून विदर्भाचा बोलबाला राहणार हे नक्की! कारण महाराष्ट्रासह अन्य तीन राज्यांचे चित्ररथ साकारण्याचे काम विदर्भातील ३० कलावंतांचे पथक अविश्रांत करीत आहे.
Maharashtra महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे, Uttar Pradesh उत्तर प्रदेशाचा अयोध्या दीपोत्सव आणि Assam आसामचे कामाख्या मंदिर या संकल्पनेवर साकारले जात असलेले चित्ररथ नागपूरकर नरेश चरडे व पंकज इंगळे यांच्या कंपनीच्या माध्यमातून आकारास येत आहेत. Wardha वर्धा आणि Yavatmaal यवतमाळ येथील ३० कलाकार अहोरात्र यासाठी झटत आहेत. Culture of Vidarbha या संपूर्ण प्रकल्पाचे दिग्दर्शन वर्धेचे रोशन इंगोले व यवतमाळचे तुषार प्रधान करीत आहेत. साडेतीन शक्तिपीठात Kolhapur कोल्हापूरची महालक्ष्मी, Tulajapur तुळजापूरची तुळजाभावनी, Mahur माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी मंदिराचे जिवंत चित्र साकारले जाणार आहे. एरवी एखादे शिल्प साकारण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत असला तरी ८ दिवसांत या शिल्पकारांनी हे चित्ररथ साकारून कलेप्रती असलेल्या समर्पणाची साक्ष दिली आहे. Culture of Vidarbha यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून आलेल्या या कलाकारांकडून साकारले जात असलेले हे चित्ररथ वैदर्भीय कलावंतांच्या कलेची झलक संपूर्ण देशाला करून दिल्याशिवाय राहणार नाहीत.
ग्रामीण आणि मागास म्हणून ज्याकडे पाहिले जाते, अशा ठिकाणांहून गेलेले कलाकार देशाच्या सर्वोच्च ठिकाणी आणि मातब्बर लोकांसमोर कलेचे सादरीकरण करीत असतील तर विदर्भासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. Culture of Vidarbha मागील वर्षीही याच कलाकारांनी साकारलेला महाराष्ट्राचा जैवविविधतेचा चित्ररथ आकर्षक ठरला होता. जैवविविधतेची मानके यात दाखविण्यात आली होती. सुमारे १५ प्राणी, २२ वनस्पती आणि फुलांचे दर्शन या चित्ररथातून देशाला घडविण्यात आले होते. यावेळी शक्तिपीठाच्या चित्ररथातून देवीच्या उपासनेचा संदेश देण्याचा आणि महाराष्ट्राच्या धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न होणार, हे नक्की! Culture of Vidarbha केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांच्या चित्ररथांचे ज्यावेळी कौतुक होईल, तेव्हाही प्रत्येक वैदर्भीयाची मान ताठ होईल. Culture of Vidarbha २६ जानेवारीच्या दिवशी कर्तव्यपथावर दिमाखात जाणारे, हे तीनही राज्यांचे चित्ररथ विदर्भातील या ३० कलावंतांच्या आयुष्याचा विजयाचा मार्ग मोकळा करीत जातील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही आणि हा क्षण विदर्भाचा म्हणविणा-या प्रत्येकासाठी गौरवाचा असेल, हेही तेवढेच खरे!