जयंत पाटलांच्या समर्थनात जळगावात राष्ट्रवादी रस्त्यावर (व्हिडीओ)

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. IL & FS प्रकरणी ईडीकडून जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. तर जळगाव शहरात देखील राष्ट्रवादीकडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील म्हणाले, निवडणूक जवळ आल्याकडून भाजपाकडून ईडी-सीबीआय या यंत्रणांचा विरोधकांवर वापर केला जातो. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर करत आहे. जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या अतिरेकामुळे जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर रस्त्यावर उतरेल. मागच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका अधिकाऱ्याने शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्या अधिकाऱ्याने दबावाखाली तक्रार दिली. त्यांचीही इडीकडून चौकशी करण्यात आली. त्यांच्याविरुध्दचे आरोप सिध्द झाले नाहीत. नबाव मलिक यांच्या विरोधातही ईडीची कारवाई करण्यात आली.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इडीचा धाक दाखवून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. सरकारच्या या दबावतंत्राचा राष्ट्रवादी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर राष्ट्रवादीकडून आंदोलने करण्यात आली. दरमूयं जयंत पाटील यांच्यावर ईडीच्या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. एजाज मलिक, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, रिकू चौधरी, सुनील माळी, कल्पना पाटील यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.