जळगाव : लोकसभा निवडणूकीची अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध होताच पहिल्याच दिवशी १८ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी
१३ उमेदवारांनी २९ अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले. पहिल्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी अर्ज घेतला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी २९ अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गणेश कौतिकराव ढेंगे, अनुराग स्टेट बँक कॉलनी जळगाव या अपक्ष उमेदवाराने स्वतःसाठी २, संजय एकनाथ माळी हनुमान नगर,धरणगाव ( अपक्ष)२, डी. डी .वाणी फोटोग्राफर रावेर( अपक्ष)२, भरत पंढरीनाथ सपकाळे, वाल्मिक नगर जळगाव( बहुजन समाज पार्टी)३, ललित गौरीशंकर शर्मा, पोलन पेठ जळगाव( अपक्ष)३, ललित गौरीशंकर शर्मा पोलन पेठ जळगाव यांनी सुरेश पांडुरंग पाटील पांडव नगरी पाचोरा यांच्यासाठी( हिंदुस्तान जनता पार्टी) ४, ईश्वर दयाराम मोरे,राधाकृष्ण नगर जळगाव ( सैनिक समाज पार्टी)१, ऍड.गोविंद जानकीराम तिवारी ( हिंदू महासभा)२, संदीप युवराज पाटील, प्रताप नगर गलवाडे रोड अमळनेर( अपक्ष)२, संदीप युवराज पाटील यांनी श्रीमती अश्विनी गोरख पाटील गलवाडे तालुका अमळनेर( अपक्ष) यांचे साठी २, योगेश सुखदेवराव बाविस्कर, आसोदा तालुका जळगाव यांनी महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांच्यासाठी १, विजय भीमराव निकम, पिंप्राळा हुडको ( अपक्ष)२, मोहन सोमा जोगी, सबगव्हाण तालुका पारोळा( अपक्ष)२ असे एकूण १३ उमेदवारांनी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २९ नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले आहेत. त्यात डी डी वाणी, ( फोटोग्राफर) रावेर ( अपक्ष) ४, जितेंद्र पांडुरंग पाटील थोरगव्हाण तालुका यावल ( अपक्ष)४, अमित हरिभाऊ कोलते मलकापूर जि. बुलढाणा ( अपक्ष)३, रमेश रंगनाथ साळवे, अनिल नगर भुसावळ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक) ३, शेख राऊत शेख युसुफ, रा. खडका ता.भुसावळ ( अपक्ष) २ , प्रवीण लक्ष्मण पाटील, रा. मलकापूर. जि. बुलढाणा ( अपक्ष)02, संजय प्रल्हाद कांडेकर,भोईवाडा,मुक्ताईनगर( अपक्ष) ४, तुषार किसन राणे रा. सालबर्डी ता. मुक्ताईनगर यांनी रक्षा निखिल खडसे, कोथळी, ता. मुक्ताईनगर ( भारतीय जनता पार्टी) ४, राहुल रॉय अशोक मुळे, किन्ही ता. जामनेर (अपक्ष) ४, ऍड. नामदेव पांडुरंग कोळी, रा. असोदा ता. जळगांव ( अखिल भारतीय हिंदू महासभा) ४, अ. आरिफ अ. गनी, जाम मोहल्ला, भुसावळ (अपक्ष ) ४, गुलाब दयाराम भिल, खडगाव ता. चोपडा ( भारत आदिवासी पार्टी)२ , अनिल पितांबर वाघ, जळगाव, (अपक्ष ) २ असे एकूण १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघ व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.