चौथ्या दिवशी जळगावसाठी 22 अर्ज तर रावेरसाठी 24 घेतले अर्ज

 

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या अर्ज घेण्याच्या व दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवार 22 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 9 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले तर चौथ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मुकेश मुलचंद कोळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष ) यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला. असे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवारी एकूण 5 अर्ज दाखल झाले.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 9 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत. यात सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव ( अपक्ष) 2, प्रदीप भीमराव मोतीराया चांदसर ता. धरणगाव (अपक्ष ) 2, प्रदीप भीमराव मोतीराया यांनी सुनंदाबाई भीमराव मोतीराया( भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) 2, विलास देवराम कोळी, कळमसरे, ता. अमळनेर ( अपक्ष) 4, किरण ब्रिजलाल कोळी, जळगाव( अपक्ष) 3, दीपक सुखदेव सोनार,जळगाव यांनी लीना शाम पाटील ( अपक्ष) 4, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, जळगाव( आम जनता पार्टी) 2, इनेश एकनाथ राठोड, लोंजे ता. चाळीसगाव ( अपक्ष) 1, गौरव दामोदर सुरवाडे, जळगाव ( अपक्ष) 2 असे एकूण 9 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत. त्यात मनोज नामदेव चौधरी, भुसावळ ( अपक्ष)2, शेख इम्रान शेख बिस्मिल्ला, मलकापूर ( अपक्ष) 4, श्रावण काशिनाथ डहाळे, राजुरा, मुक्ताईनगर (अपक्ष ) 2, उमेश दत्तात्रय पाटील, ममुराबाद यांनी रवींद्र प्रल्हादराव पाटील, मानूर,बोदवड ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी 2,राहुल बापू साळुंके, किनगाव यांनी जगन देवराम सोनवणे, भुसावळ(अपक्ष )यांचेसाठी 4, विजय मधुकर साळुंके, किनगाव यांनी पुष्पा जगन सोनवणे, भुसावळ (अपक्ष ) यांच्यासाठी 4, गजानन रमेश रायडे, जामनेर (अपक्ष ) 4, शेख रमजान शेख करीम, भुसावळ यांनी नाजमीनबी शेख रमजान (सर्व समाज जनता पार्टी )2 असे एकूण 8 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश मुलचंद कोळी , शिरसोली, प्र. न, तालुका जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तर संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष )यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला. सोमवार 22 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 1 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 4 असे एकूण 5 अर्ज सोमवारी दिवसभरात दाखल झाले.